ऋषभ पंतने अक्षर पटेलला ‘वसीम भाई’ असं का पुकारलं? ऋषभ आणि रहाणेचं रहस्य उलगडलं

ऋषभ पंतने अक्षर पटेलला ‘वसीम भाई’ असं का पुकारलं? ऋषभ आणि रहाणेचं रहस्य उलगडलं

हमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टेस्ट मॅच (India vs England, 3rd Test) दरम्यान ऋषभ पंत सतत अक्षर पटेलला (Axar Patel) ‘वसीम भाई’ (Wasim Bhai) अशी हाक मारताना दिसला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या आक्रमक बॅटिंगसोबतच उत्कृष्ट विकेट कीपिंग आणि स्टंम्पमागून सुरू असलेल्या अखंड कॉमेंट्रीमुळेही नेहमीच चर्चेत असतो. सामन्या दरम्यान ऋषभ पंत स्टंपच्या मागून मजेशीर कॉमेंट्री करत असतो, त्यामुळं सहकारी खेळाडू आणि चाहत्यांचंही चांगलंच मनोरंजन होत असतं. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टेस्ट मॅच (India vs England, 3rd Test) दरम्यान ऋषभ पंत सतत अक्षर पटेलला (Axar Patel) ‘वसीम भाई’ (Wasim Bhai) अशी हाक मारताना दिसला. त्याचं हे हाक मारणं स्टंप माईकमध्येही रेकॉर्ड झालं आहे. ऋषभ पंत अक्षर पटेलला वसीम भाई अशी हाक का मारतो, याबद्दल सगळ्यानाच कुतूहल होतं. या मागचं रहस्य खुद्द अक्षर पटेलनंच उलगडलं आहे.

लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलनं या मॅच दरम्यान चांगली कामगिरी केली आहे. अक्षर पटेलनं टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात सहा विकेट्स आणि दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीबद्दल त्यानं मॅन ऑफ दी मॅचही मिळवलं. त्यावेळी अक्षर पटेलनं मॅच दरम्यान ऋषभ पंत त्याला वसीम भाई म्हणून का हाक मारत होता यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, ‘जेव्हा मी आर्म बॉल टाकतो तेव्हा ऋषभ पंत मला म्हणतो की तू वसीम (वसीम अक्रम ) भाईसारखा बॉलिंग करतो. तू फास्ट बॉलिंग करतो. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मला हे नाव दिलं. ऋषभ पंतनं हे ऐकल्यापासून तो मला याच नावाने हाक मारतो.’

अक्षर पटेलनं दोन टेस्ट मॅचमध्ये तीन आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याला टेस्ट मॅच सोप्या वाटतात का? यावर उत्तर देताना त्यानं सांगितलं की, ‘मी माझा फॉर्म गमावू इच्छित नाही. सध्या हे शक्य झालं आहे. त्यावेळी मी हे सोपं किंवा कठीण आहे याचा विचार करत नाही. आता मी विकेट घेत असलो तरी कोणीही माझ्या बॅटिंगची चेष्टा करत नाही; पण मला बॅटिंगमध्येही जास्त योगदान देण्याची इच्छा आहे आणि त्याबाबत मी सकारात्मक आहे.’

 अवश्य वाचा -   भारताच्या आणखी एका ऑलराउंडरचा क्रिकेटला अलविदा! 2 वर्ल्डकप जिंकण्यात होती महत्त्वाची भूमिका

बॉलिंगमधील आपल्या सामर्थ्याबद्दल अक्षर पटेल म्हणाला की, ‘मला माहिती आहे की मी जेव्हा बॉल टाकतो तेव्हा तो विकेट टू विकेट टाकत असतो. मी बॅट्समनला जास्त जागा देत नाही. बॅट्समननं चूक केली तर मला विकेट मिळेल, हे मला माहित आहे. माझा नेहमी हाच विचार असतो की मी बॅट्समनला रन घेणं अवघड कसं करून ठेवू शकतो. आजकाल बॅट्समनच्या डोक्यात हेच असतं की, एक किंवा दोन ओव्हर मेडन खेळल्या पाहिजेत. त्यामुळं तो चुकीचा शॉर्ट मारतो आणि मला विकेट मिळण्याची शक्यता वाढते.’ ‘यापुढंही अशाच प्रकारचं पिच मिळावं अशी आशा आहे. ज्यामुळे माझा फॉर्म टिकून राहिल, अशी अपेक्षाही अक्षर पटेलनं व्यक्त केली.

दरम्यान, स्पिनर आर. अश्विननं या टेस्ट मॅच दरम्यान 400 विकेट्स पूर्ण करत इतिहास रचला. भारतासाठी 400 टेस्ट विकेट्स घेणारा आर. अश्विन चौथा बॉलर ठरला आहे.

Link - https://www.news18.com/cricketnext/news/india-vs-england-why-does-rishabh-pant-call-axar-patel-wasim-bhai-the-spinner-explains-3474554.html

Priya More

First published: February 26, 2021, 7:25 PM IST

ताज्या बातम्या