भारताच्या आणखी एका ऑलराउंडरचा क्रिकेटला अलविदा! 2 वर्ल्डकप जिंकण्यात होती महत्त्वाची भूमिका
MS Dhoniच्या नेतृत्वात भारताला 2 विश्वकप मिळवून देणाऱ्या संघाचा भाग असणारा विस्फोटक फलंदाज युसुफ पठाणने (Yusuf Pathan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती ( announces retirement) जाहीर केली आहे.
मुंबई, 26 फेब्रुवारी: भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनानंतर (Suresh Raina) भारताच्या आणखी एका विस्फोटक फलंदाजाने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताला 2 विश्वकप मिळवून देणाऱ्या संघाचा भाग असणाऱ्या विस्फोटक फलंदाजाने युसुफ पठाणने (Yusuf Pathan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती ( announces retirement) जाहीर केली आहे. यावेळी त्याने ट्वीटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
त्याने ट्वीटरवर भावनिक पोस्ट करत आपल्या क्रिकेट कारकीर्दीला उजाळा दिला आहे. त्याने या पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचा आणि त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या एमएस धोनी, गौतम गंभीर यांचे आभार मानले आहेत. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ' ज्या दिवशी भारताची जर्सी घातली तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अगदी बालपणापासून माझं आयुष्य क्रिकेटच्या अवती भवतीच फिरत आलं आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसोबत प्रथम श्रेणीतील सामने आणि आयपीएलही खेळलो आहे.'
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirementpic.twitter.com/usOzxer9CE
'सध्या देशात विश्वकप किंवा आयपीएलचा अंतिम सामना सुरू नाही. पण सध्याच्या काळ थोडा वेगळा असून माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या कारकीर्दीच्या इनिंगला अलविदा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी आता अधिकृतपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे,' असंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारे युसुफने वर्ल्डकप जिंकल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरला आपल्या खांद्यावर घेवून मैदानात मिरवणूक काढली होती. आणि हाच क्षण त्याच्या कारकीर्दीतला विस्मरणीय असल्याचं त्याने म्हटलं आहे. शिवाय यावेळी त्याने आपल्या भाऊ इरफान पठाणचं आभार मानलं आहे.