Home /News /sport /

T20WC: इंग्लंडविरुद्ध षटकारांची बरसात करणारा डॅरेल मिचेल आहे तरी कोण?

T20WC: इंग्लंडविरुद्ध षटकारांची बरसात करणारा डॅरेल मिचेल आहे तरी कोण?

Daryl mitchell

Daryl mitchell

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World CUp) पहिल्या सेमी फायनलमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत करत फायनलमधील आपले स्थान पक्के केले. यावेळी नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल हिरो ठरला आहे.

  दुबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World CUp) पहिल्या सेमी फायनलमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत करत फायनलमधील (NZ vs ENG) आपले स्थान पक्के केले. बुधवारी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या साम्यान्यात इंग्लंडचा संघ एका क्षणी सामना जिंकेल असेच वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत विजय आपल्या नावे केला. यावेळी नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल (Daryl mitchell ) हिरो ठरला आहे. तर इंग्लंडविरुद्ध महत्त्वाची कामगिरी बजावणारा डॅरेल मिचेल कोण आहे ? जाणून घेऊया... इंग्लंडविरुद्ध 167 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. मार्टीन गप्टील आणि केन विल्यमसन झटपट आऊट झाले. ओपनिंगला आलेल्या डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) 47 बॉलमध्ये नाबाद 72 रनची इनिंग खेळत न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

  डॅरेल मिचेल कोण आहे ?

  डॅरिल मिचेलचा जन्म 20 मे 1991 रोजी हॅमिल्टन येथे झाला. ३० वर्षीय मिचेल न्यूझीलंडसाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. डॅरिल मिचेल हे एक प्रसिद्ध नाव आहे कारण त्याचे वडील रग्बी प्रशिक्षक जॉन मिशेल यांचे पुत्र आहेत. जॉन मिचेल हे एक प्रसिद्ध नाव आहे, पण तरीही डॅरिलने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो यशस्वीही झाला. मिचेल हा मधल्या फळीतील फलंदाज असला तरी तो अचानक सलामीवीर बनला. डॅरिल मिचेलला टी20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात ओपनिंगसाठी प्रयत्न केले गेले, त्यानंतर त्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये, डॅरिल मिचेलने मार्टिन गुप्टिलला सलामीला साथ दिली. मिचेलने पुन्हा दमदार खेळी करत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. उपांत्य फेरीत मिचेलच्या फलंदाजीचे फळ मिळाले, जिथे त्याने 4 चौकार आणि तब्बल षटकार मारले. न्यूझीलंडला 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना मिचेलने वोक्सच्या चेंडूवर दोन दमदार षटकार ठोकून सामना किवी संघाच्या खिशात घातला.

  मिचेलची कारकीर्द

  डॅरिल मिचेलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, डॅरेल मिचेलने वयाच्या २८ व्या वर्षी न्यूझीलंडकडून पदार्पण केले. आधी टी-20, मग कसोटी आणि नंतर एकदिवसीय संघात स्थान मिळाले. पहिल्याच कसोटीत त्याने अर्धशतक ठोकले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सातव्या क्रमांकावर उतरून शतक केले. त्याने आतापर्यंत पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मिचेलने पाच कसोटी डावांमध्ये 58 च्या सरासरीने 232 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांच्या दोन डावात त्याने शतकाच्या जोरावर 112 धावा केल्या. याशिवाय 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 19 डावांमध्ये त्याने अर्धशतकाच्या मदतीने 345 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत एक विकेट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup

  पुढील बातम्या