जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : भारतासाठी बॅटिंग करायला आला, पण पोलीस उचलून घेऊन गेले, VIDEO

IND vs ENG : भारतासाठी बॅटिंग करायला आला, पण पोलीस उचलून घेऊन गेले, VIDEO

तिसऱ्या टेस्टमध्ये मैदानात पुन्हा आला जारवो

तिसऱ्या टेस्टमध्ये मैदानात पुन्हा आला जारवो

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टदरम्यान (India vs England Third Test) मैदानात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट जाताच एक फॅन बॅटिंगसाठी मैदानात उतरला. हा फॅन दुसरा तिसरा कोणीही नसून जारवो (English Fan Jarvo) होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टदरम्यान (India vs England Third Test) मैदानात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट जाताच एक फॅन बॅटिंगसाठी मैदानात उतरला. हा फॅन दुसरा तिसरा कोणीही नसून जारवो (English Fan Jarvo) होता. लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशीही जारवो मैदानात बॉलिंग करण्यासाठी आला होता. यावेळी मात्र तो हेल्मेट आणि मास्क घालून बॅटिंगसाठी मैदानात उतरला. धक्कादायक म्हणजे जारवो पिचपर्यंत पोहोचला, तरी सुरक्षा रक्षकांना हे लक्षातही आलं नाही. यानंतर जारवोला पकडून त्याला बाहेर नेण्यात आलं.

जाहिरात

जारवोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लॉर्ड्स टेस्टमध्येही जारवो टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आला होता. सुरक्षा रक्षक, प्रेक्षक, कॉमेंटेटर आणि खेळाडू जारवोला पुन्हा पाहून आश्चर्यचकीत झाले.

कोरोना काळामध्ये अशाप्रकारे एखादा प्रेक्षक थेट खेळाडूंच्या जवळ येत असेल, तर त्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात