• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 15 ओव्हरमध्ये 15 सिक्स, T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलर्सची पिसं काढायला ही टीम तयार

15 ओव्हरमध्ये 15 सिक्स, T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलर्सची पिसं काढायला ही टीम तयार

यंदाच्या वर्षीचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये होणार आहे, यासाठी प्रत्येक टीम तयारीला लागली आहे, पण गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या (West Indies) टीमला मोक्याच्या क्षणी फॉर्म सापडला आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : यंदाच्या वर्षीचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये होणार आहे, यासाठी प्रत्येक टीम तयारीला लागली आहे, पण गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या (West Indies) टीमला मोक्याच्या क्षणी फॉर्म सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय झाला आहे, याचसोबत विंडीज टीमने 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करत 160/6 रन केले, पण वेस्ट इंडिजच्या आक्रमक बॅट्समननी हे आव्हान 15 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. एवढच नाही तर त्यांनी 15 सिक्सही लगावले. या सीरिजची दुसरी मॅच रविवारी रात्री उशीरा सुरू होईल. वेस्ट इंडिजने सर्वाधिक 2 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर आता या टी-20 वर्ल्ड कपसाठीही त्यांची टीम सज्ज आहे. टीमचे दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard), क्रिस गेल (Chris Gayle), ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) आणि आंद्रे रसेल (Andre Russel) या सीरिजमध्ये एकत्र खेळत आहेत. हे चारही खेळाडू 6 वर्षानंतर एकत्र मैदानात दिसले. क्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन तर ब्राव्होच्या नावावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. 161 पैकी 126 रन बाऊंड्रीच्या टॉस हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून 160 रन केले. वॅनडर डुसेनने 56 रनची नाबाद खेळी केली. वेस्ट इंडिजकडून फॅबियन (Fabien Allen) एलन आणि ड्वॅन ब्राव्होने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या वेस्ट इंडिजने जलद सुरुवात केली. आंद्रे फ्लेचरने (Andre Fletcher) 30 आणि एव्हिन लुईसने (Evin Lewis) 71 रनची खेळी करत पहिल्या विकेटसाठी 7 ओव्हरमध्ये 85 रनची पार्टनरशीप केली. फ्लेचरने 19 बॉलच्या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. तर लुईसने 35 बॉलचा सामना करत 4 फोर आणि 7 सिक्स मारले. एव्हिन लुईसचं हे सातवं अर्धशतक होतं. 35 आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणाऱ्या लुईसने दोन शतकंही केली आहेत. दुसरीकडे क्रिस गेलने 41 वर्षांच्या क्रिस गेलने 24 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले, यात 1 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर आंद्रे रसेलने 12 बॉलमध्ये 23 रन केले. रसेलच्या इनिंगमध्ये 1 फोर आणि 3 सिक्स होत्या, म्हणजेच रसेलने 23 पैकी 22 रन फोर आणि सिक्सच्या माध्यमातून केले. एवढच नाही तर त्याने एक विकेटही घेतली. रसेल 13 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी उतरला. वेस्ट इंडिजच्या टीमने या 161 रनचा पाठलाग करताना 15 सिक्स आणि 9 फोर लगावले, म्हणजेच 126 रन त्यांनी बाऊंड्रीच्या माध्यमातून केल्या.
  Published by:Shreyas
  First published: