मुंबई, 19 डिसेंबर: महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni ) असा एकमेव कर्णधार आहे ज्याला आगामी आयपीएल सीझनसाठी (IPL2022)संघाने रिटेन केले आहे. नेहमीच माहीची या ना त्या कारणाने क्रिकेट जगतात चर्चा सुरु असते. दरम्यान, धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याचा फिटनेस पाहून फॅन्स भलतेच चकित झाले आहेत.
महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबई एयरपोर्टचा असून धोनी आपल्या कुटूंबासोबत स्पॉट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपुर येथे होणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नासाठी धोनी रवाना झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून फॅन्स क्रेजी झाले आहेत.
व्हिडीओमध्ये धोनी ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये कुल लूकमध्ये दिसत आहे. तर साक्षीने प्रिंटेड गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जीव नेहमीसारखीच क्यूट दिसत आहे. वयाच्या 40 व्या वर्षी धोनीचा हा स्टनिंग कुल लूक पाहून चाहते चकित झालेत. त्याचा फिटनेसपाहून धोनीचे वय खरचं 40 आहे का? असा सवाल फॅन्स उपस्थित करत आहेत.
View this post on Instagram
सीएसकेनेदेखील त्यांच्या कर्णधाराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धोनीला आयपीएल 2022 साठी फ्रँचायझीने 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
रवींद्र जडेजाला सीएसकेने 16 कोटी, मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये रिटेन केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने यंदाच्या आयपीएल IPL 2021चषकावा आपले नाव कोरले. जे सीएसकेचे चौथे विजेतेपद होते. युएईमध्ये नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकातही धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक होता. मात्र, या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा प्रवास लवकरच संपला. संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Sakshi dhoni