रायपूर, 5 मार्च: सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar playing again) आणि वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) ओपनिंगला येत गाजवलेल्या त्या तमाम सामन्यांची आठवण या सामन्यामुळे जागी झाली. साक्षात क्रिकेटचा देव पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी उतरला. त्या 10 नंबरच्या जर्सीला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. निमित्त होतं रस्ते सुरक्षा विश्व मालिकेचं (Road Safety World Series). या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये India Legends विरुद्ध बांग्लादेश लीजंड्स असा सामना शुक्रवारी रंगला. बांग्लादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सगळी टीम 109 धावांत गारद झाली. त्यानंतर फलंदाजीस भारतीय संघ उतरला. वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या जोशात 35 चेंडूत 80 रन्स काढल्या. त्याचे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. 10 फोर आणि 5 सिक्सर ठोकलेल्या पाहून प्रेक्षक खूश झाले. सचिन तेंडुलकरनेही त्याला छान साथ दिली. 26 बॉल्समध्ये 33 रन्स सचिनने काढल्या. सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टरचा हा VIDEO आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
फील्डिंग करणाऱ्या मास्टर ब्लास्टरचा हा VIDEO
The Jersey No. 10 on the field!🤩
— CrickeTendulkar 🇮🇳 (@CrickeTendulkar) March 5, 2021
Life is Good Again 😍#SachinTendulkar pic.twitter.com/QmHuelPrix
आता या वर्ल्ड सीरिजमध्ये 6 मार्चला श्रीलंका लीजंड्स आणि वेस्ट इंडिज लीजंड्स या संघांदरम्यान मॅच होईल. 1996 मधील विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला अजिंक्यपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आक्रमक सलामीवीर सनथ जयसूर्या (Sanath Jaysurya) श्रीलंका लीजंड्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. बुमराहसोबत नाव जोडलं गेलेली संजना गणेशन कोण आहे? जाणून घ्या पुणे कनेक्शन या स्पर्धेतील सर्व मॅचेस रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होतील. देशात रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या टी 20 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) या स्पर्धेतील पहिलं सत्र 4 मॅचेसनंतर 11 मार्चला तहकूब करण्यात आलं होतं.