नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: राष्ट्रपती भवनात सोमवारी देशभरातील विविध क्षेत्रातील 141 लोकांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये बॅडमिंटनपटू पीवी सिंधूचाही(p v sindhu ) समावेश होता. सिंधूला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळण्याच्या काही वेळ आधी तिने स्वतःचा डान्स(p v sindhu dance video) करतानाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. बॅडमिंटनपटू पीवी सिंधूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘love nwantiti’ या गाण्यावर डान्स करतान दिसत आहे. सिंधू पहिल्यांदाच डान्स करताना दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिचा हा व्हि़डीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तिने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. दागिन्यांनी सजली आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने दिवाळी पोस्टच्या सिरीजमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका दिवसात त्याला तब्बल 4 लाखापेक्षा लोकांनी पाहिले आहे. तर तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सोमवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पीव्ही सिंधू देखील उपस्थित होती. यावेळी तिला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सिंधूने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली की, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्कारासाठी मी भारत सरकार, सर्व मंत्री आणि राष्ट्रपती महोदयांची आभारी आहे. मी खूप आनंदी आहे. येणाऱ्या भविष्यात अजून चांगली कामगिरी करण्यासाठी अशाप्रकारचे पुरस्कार खूप प्रोत्साहन, समर्थन आणि प्रेरणा देतात.” दरम्यान, सिंधूने भारतासाठी आतापर्यंत दोन ऑलिंपिक पदक जिंकले आहेत. यामध्ये तिच्या एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.