जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Sri Lanka Pakistan Test Match : श्रीलंका-पाकिस्तान मॅचमध्ये घडला मजेशीर किस्सा, दोन्ही संघातल्या खेळाडूंनाही आवरलं नाही हसू

Sri Lanka Pakistan Test Match : श्रीलंका-पाकिस्तान मॅचमध्ये घडला मजेशीर किस्सा, दोन्ही संघातल्या खेळाडूंनाही आवरलं नाही हसू

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये हास्यास्पद प्रसंग

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये हास्यास्पद प्रसंग

Sri Lanka Pakistan Test Match : श्रीलंकेविरुद्धच्या या टेस्ट मॅचमध्ये अंतिम विकेटच्या भागीदारी दरम्यान एक विचित्र घटना घडली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 जुलै : क्रिकेट मॅचेसदरम्यान काही वेळा विचित्र प्रसंग किंवा खास किस्से घडतात. या गोष्टींची क्रिकेट रसिकांसह प्लेअर्समध्ये जोरदार चर्चा होत असते. सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानदरम्यान श्रीलंकेत टेस्ट मॅचेस सुरू आहेत. गॅले मैदानावर सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या इनिंगमध्ये अंतिम विकेटसाठी अब्रार अहमद आणि सौद शकील हे प्लेअर्स पार्टनरशिप करत असताना एक विचित्र घटना घडली. या विचित्र आणि हास्यास्पद घटनेत अब्रारने प्रचंड हुशारीने रनआउट होण्यापासून स्वत:चा बचाव केला. टेस्ट मॅचच्या या इनिंग दरम्यान नेमकी काय घटना घडली ते सविस्तर जाणून घेऊया. श्रीलंकेतील गॅले येथे सुरू असलेल्या श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तानच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानने 461 रन्स पर्यंत मजल मारत यजमान टीमवर 149 रन्सने आघाडी घेतली. या मॅचमध्ये सौद शकीलने दमदार खेळी केली. शकील 361 चेंडूत 208 रन्स काढून नॉट आउट राहिला. त्याने टेलेंडर्ससोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शकीलने नसीम शाहसोबत (78 बॉल्समध्ये 6 रन) नवव्या विकेटसाठी 94 रन्सची भागीदारी केली. तसेच अब्रार अहमद (10 रन) सोबत अंतिम विकेटसाठी 21 रन काढले. या इनिंगमध्ये सौद शकीलने आक्रमक बॅटिंग करत आगा सलमानसोबत (83 रन) 177 रन्सची शानदार भागीदारी केली. नाबाद 201 रन्सच्या खेळीत शकीलने 19 चौकार ठोकले. तसेच 57.62 च्या स्ट्राइक रेटने रन काढले. सौद शकीलने गेल्या वर्षी रावळपिंडी येथे इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी त्याने 10 इनिंग्जमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. वाचा - मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन, शेवटची पोस्ट होतेय व्हायरल दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या टेस्ट मॅचमध्ये अंतिम विकेटच्या भागीदारी दरम्यान एक विचित्र घटना घडली. इनिंगच्या 120 व्या ओव्हरमध्ये अब्रारने प्रचंड हुशारीने स्वत: चा रनआउटपासून बचाव केला. रमेश मेंडिसचा बॉल होऊन अब्रारच्या ग्लोव्हजना लागला आणि बॉल त्याच्या डाव्या पायातील पॅडमध्ये गुडघा आणि पॅडच्या फ्लॅप मध्ये अडकला. विकेटकीपर सदिरा समरविक्रमाने या वेळी बॉल काढून घेऊन अब्रारला रनआउट करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पण अब्रारने त्याला क्रीझच्या बाहेर नेलं दोघंही पाठीला पाठ लावून काही पावलं चाललं पण सदिरा पॅडमधून बॉल काढू शकला नाही, अब्रारने तो काढूच दिला नाही. अब्रारने क्रीझबाहेर जाऊन पॅडमधला बॉल ग्राउंडवर पाडला. त्यानंतर अब्रार पटकन क्रीझमध्ये परतला आणि रन आउटपासून स्वत: चा बचाव केला. या वेळी श्रीलंकेच्या विकेटकीपरसह फिल्डर गोंधळले. हा प्रकार पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तानी क्रिकेटर्सना हसू आवरलं नाही. याचा व्हिडिओ @waqu_hassan15 या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या विचित्र प्रसंगानंतर शकील आणि अब्रारने आणखी नऊ बॉल्सचा सामना केला. अखेरीस मेंडिसच्या बॉलवर अब्रार 10 रनांवर बाद झाला. या इनिंगमध्ये 101 रन झालेले असताना पाकिस्तानची निम्मी टीम तंबूत परतली होती. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत सापडला होता. बाबर आझम (13 रन) आणि शान मसूद (39 रन) मोठी खेळी करण्यात अयशस्वी झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला टेस्ट क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन करणार सरफराज अहमद केवळ 17 रन करु शकला. या स्थितीत शकीलने इनिंग सावरत नॉट आउट 201 रन केले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात