मुंबई, 19 जुलै : मराठी मातीचं नाव जगभरात पोहचवणारा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर (Ashish Sakharkar) याचं निधन झालं आहे. आशिषनं देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत महाराष्ट्राच नाही तर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक पुरस्कारावर आशिषनं आपलं नाव कोरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष एका आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानंच आशिषचा जीव घेतला. या घटनेनंतर आशिषच्या चाहत्यांना मोठा धक्का पोहचला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आशिषच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. कशी होती आशिषची कारकीर्द? चार वेळा मिस्टर इंडिया विजेता, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आशिष साखरकर म्हणजे, अनेक बॉडीबिल्डर्सचे रोल मॉडल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात आशिष साखरकर यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील आयकॉन मानलं जातं. काही दिवसांपूर्वी आशिष साखरकर यांना आजारानं ग्रासलं होतं. याच आजारावर गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर उपचार घेते होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आशिष हे प्रत्येक बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांसाठी आयकॉन होते. आशिषची शेवटची पोस्ट “मिस्टर युनिव्हर्स 2011, माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस, कास्यपदक”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले होते. आशिषची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याचे असंख्य चाहते आणि मित्र श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
आशिष साखरकरने चार वेळा ‘मिस्टर इंडिया’चा किताब मिळवला होता. त्याबरोबरच तो चार वेळा ‘फेडरेशन कप’ विजेताही ठरला होता. तसेच त्याला ‘मिस्टर युनिव्हर्स’ या स्पर्धेत रौप्य व कास्यपदक मिळाले होते. याबरोबरच त्याने ‘मिस्टर आशिया’ या स्पर्धेत रौप्यपदकाची कामगिरी केली होती. तसेच ‘युरोपियन चॅम्पियनशिप’, ‘शिवछत्रपती’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कार आणि सन्मानांवर आशीषने स्वत:चे नाव कोरले होते.

)







