'सबका बदला लेगा रे तेरा व्हाइट वॉकर', अश्विनच्या प्रश्नाला जाफरचं भन्नाट उत्तर

'सबका बदला लेगा रे तेरा व्हाइट वॉकर', अश्विनच्या प्रश्नाला जाफरचं भन्नाट उत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचा बॅटिंग प्रशिक्षक वसीम जाफर (Wasim Jaffer) हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडियावरच्या त्याच्या पोस्ट हा कायमच हटके असतात, त्यामुळे तो कायमच चर्चेत असतो.

  • Share this:

मुंबई, 11 जून : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचा बॅटिंग प्रशिक्षक वसीम जाफर (Wasim Jaffer) हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडियावरच्या त्याच्या पोस्ट हा कायमच हटके असतात, त्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. वसीम जाफर अनेकवेळा मीम्स पोस्ट करून क्रिकेटपटू आणि चाहत्यांना उत्तर देतो. यावेळी वसीम जाफरने भारताचा स्पिनर अश्विनच्या (R Ashwin) ट्वीटवर मजेदार प्रतिक्रिया दिली.

अश्विनने शुक्रवारी एक फोटो शेयर केला, यामध्ये तो चेतेश्वर पुजारासोबत (Cheteshwar Pujara) गंभीर विषयावर बोलत असल्याचं दिसत आहे. आमच्या दोघांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा सुरू असेल? असा प्रश्न अश्विनने चाहत्यांना विचारला.

अश्विनच्या या प्रश्नावर चाहत्यांनीही भन्नाट उत्तरं दिली, त्यातच वसीम जाफरचाही समावेश होता. हे उत्तर देताना वसीम जाफरने गेम ऑफ थ्रॉन्स आणि गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटांचा मिळून डायलॉग बनवला. जाफरने 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2019 वर्ल्ड कपची आठवण काढली आणि पुजारा दोन्ही स्पर्धांचा बदला घेईल, असं सांगितलं.

'2016 टी-20 वर्ल्ड कप, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल, सबका बदला लेगा रे तेरा व्हाइट वॉकर,' असं वसीम जाफर म्हणाला. भारताने 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती, पण आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धांच्या सेमी फायनलमध्ये भारताला अपयश आलं, त्यामुळे टीम इंडिया स्पर्धेच्या बाहेर गेली.

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 5:36 PM IST

ताज्या बातम्या