कबीर खान जेव्हा खेळाडू होता, तेव्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव होतो. त्यानंतर कबीर खानवर टीकेची झोड उठते आणि त्याला गद्दार म्हणून संबोधलं जातं. यानंतर कबीर खान महिला टीमचा प्रशिक्षक बनतो आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करतो, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. इंग्लंड टीमचे मॅनेजर साऊथगेट यांची कहाणीही अशीच आहे. 1996 साली साऊथगेट पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाले, दुर्दैवाने 2021 सालीही इंग्लंड टीमचा कोच असताना त्यांना युरो कप जिंकण्यात अपयश आलं. जाफरने ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फक्त हा बॉलिवूड चित्रपट असता तर'. याचसोबत त्याने हृदय तुटल्याचा इमोजीही पोस्ट केला.Only if it was a Bollywood movie 💔#EURO2020 #GarethSouthgate #Italy #ItsGoingRome 🏆 pic.twitter.com/tvmmZ06kun
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.