मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोहम्मद सिराजवर वॉशिंग्टन सुंदरने उपस्थित केले 'प्रश्न', सांगितली कमतरता

मोहम्मद सिराजवर वॉशिंग्टन सुंदरने उपस्थित केले 'प्रश्न', सांगितली कमतरता

भारतीय टीम (Team India) 2 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) भारतीय टीममध्ये स्थान मिळालं आहे.

मुंबई, 21 मे : भारतीय टीम (Team India) 2 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) भारतीय टीममध्ये स्थान मिळालं आहे. इंग्लंडला जाण्याआधी वॉशिंग्टन सुंदरने मोहम्मद सिराजवर प्रश्न उपस्थित करत त्याची कमतरता सांगितली आहे. घाबरू नका, सुंदरने सिराजच्या क्रिकेटबद्दल नाही, तर त्याच्या फॅशनबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका मुलाखतीमध्ये सुंदरला मोहम्मद सिराजची कोणती गोष्ट बदलावीशी वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सिराजने फॅशन बदलली पाहिजे, असं उत्तर दिलं.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सुंदर म्हणाला, 'फॅशनच्या बाबतीत सिराज थोडा मागे आहे, त्याला यामध्ये थोडं काम करण्याची गरज आहे. फॅशनच्या खेळात सिराजला त्याचा दर्जा वाढवावा लागेल. जर तो ट्रेन्डच्या हिशोबाने गेला, तर चमत्कार करू शकतो.'

विराट क्रिकेटचा किंग

विराट कोहलीला (Virat Kohli) नेटमध्ये किती वेळा आऊट केलं? असंही सुंदरला विचारण्यात आलं. 'नेटमध्ये विराट कोहलीची विकेट घेणं खूप कठीण आहे. तो क्रिकेटचा किंग आहे. मला जर नेटमध्ये विराटची विकेट घेता आली, तर खूप आनंद होईल,' अशी प्रतिक्रिया सुंदरने दिली. तसंच सुंदरने अश्विनचंही (R Ashwin) कौतुक केलं. अश्विनकडे विविधता आहे, त्यामुळे मला त्याच्याकडून शिकायचं आहे. सेकंदांमध्ये तो आपली बॉलिंग बदलतो, असं सुंदर म्हणाला.

वॉशिंग्टन सुंदर सध्या बीसीसीआयच्या बायो-बबलमध्ये आहे. सुंदर जेव्हा घरी होता, तेव्हा त्याला कोरोना होऊ नये म्हणून वडिलांनी स्वत:चं घर सोडून दुसऱ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. आयकर विभागात प्रशासकीय अधिकारी आहेत. नोकरीमुळे सुंदरच्या वडिलांना आठवड्यातून तीनवेळा कामावर जावं लागतं. चेन्नईत कोरोना रुग्णांची संख्या बघता त्यांनी घरी न येण्याचा निर्णय घेतला. सुंदरची इंग्लंड दौऱ्यावर ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुंदरने प्रभावित केलं होतं.

First published:

Tags: Cricket, Team india, Washington sunder