मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वयाच्या 38 व्या वर्षीही Mithali Raj आहे अविवाहित, 'हे' आहे खास कारण

वयाच्या 38 व्या वर्षीही Mithali Raj आहे अविवाहित, 'हे' आहे खास कारण

Mithali Raj

Mithali Raj

भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटर (Mithali Raj ) मिताली राजने आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य करत लग्न न करण्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटर मिताली राजचे (Mithali Raj ) देशासह जगभरात अनेक चाहते पाहायला मिळतात. तिच्या नावे अनेक विक्रमांचीही नोंद आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर, अशी उपमा तिला दिली जाते. क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या याच मितालीने खासगी आयुष्यावर भाष्य करत लग्न न करण्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

क्रिकेट हे पहिले प्रेम नाही

भारताची स्टार फलंदाज मिताली राजने आपल्या खेळाने स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. पण खेळ हे तिचे पहिले प्रेम नव्हते. वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली. तिला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. मितालीचा भाऊ आणि वडीलही माजी क्रिकेटपटू आहेत.

वयाची 38 वर्षे होऊनही मिताली आजही अविवाहित आहे. तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर भाष्य करताना मिताली म्हणाली, बऱ्याच काळापूर्वी जेव्हा मी लहान होते त्यावेळी माझ्या मनात (हा) विचार आला होता. पण, आता मात्र मी विवाहितांना पाहते तेव्हा असा कोणताही विचार माझ्या मनात येत नाही. मी सिंगलच फार चांगली आहे, आनंदी आहे. असे मत तिने यावेळी व्यक्त केले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

मिताली राजने 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून तिची बॅट धावत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7000 हून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 7 शतके आहेत. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये 2364 धावा केल्या आहेत. तो अतिशय क्लासिक फलंदाज आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Mithali raj