मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni च्या त्या निर्णयानंतर निवृत्त होणार होतो, पण सचिनने थांबवलं, Sehwag चा 14 वर्षांनंतर खुलासा!

MS Dhoni च्या त्या निर्णयानंतर निवृत्त होणार होतो, पण सचिनने थांबवलं, Sehwag चा 14 वर्षांनंतर खुलासा!

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 7 वर्ष झाली आहेत, पण सेहवागने पहिल्यांदाच त्याच्या निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.

    मुंबई, 1 जून : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 7 वर्ष झाली आहेत. सेहवागची गणती जगातल्या आक्रमक ओपनरमध्ये होते. आपल्या क्रिकेट करियरमध्ये सेहवागने जगातल्या दिग्गज बॉलर्सना धुतलं. त्याच्या बऱ्याच इनिंग आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहतात. यशस्वी बॅट्समन असूनही सेहवागच्या डोक्यात वनडे क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा विचार आला होता. स्वत: सेहवागने याचा खुलासा केला आहे. 2008 साली भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) सेहवागला वनडे टीममधून काढलं होतं, यावेळी माझ्या मनात निवृत्तीचा विचार येत होता, असं सेहवाग क्रिकबझसोबत बोलताना म्हणाला. '2008 ला आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये होतो. माझ्या डोक्यात निवृत्त होण्याचा विचार आला. टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करून मी 150 रन केले होते. वनडेमध्ये 3-4 मॅचमध्ये मला रन करता आले नाहीत, यानंतर धोनीने मला प्लेयिंग इलेव्हन मधून काढून टाकलं. तेव्हा आपण वनडेतून संन्यास घ्यावा आणि टेस्ट क्रिकेट खेळावं,' असं मला वाटत होतं, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. सचिनने थांबवलं मला वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्यापासून सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) रोखलं. हा तुझ्या करियरमधला खराब काळ आहे. थोडं थांब आणि आणखी विचार कर आणि मग काय करायचं ते ठरवं, असा सल्ला सचिनने मला दिल्याचं सेहवागने सांगितलं. यानंतर सेहवाग 7-8 वर्ष भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला. 2011 साली वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचा सेहवाग महत्त्वाचा भाग होता. सीबी सीरिजमध्ये सेहवाग फ्लॉप भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कॉमनवेल्थ बँक सीरिजमध्ये सेहवाग फ्लॉप ठरला. त्याला 4 मॅच खेळण्याची संधी मिळाली, यात त्याने 6, 33, 11 आणि 4 रन केले. यानंतर ऍडलेडमध्ये झालेल्या दोन मॅचमध्ये त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं. सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात त्याचं पुनरागमन झालं पण तो 14 रनवर आऊट झाला. भारताने सीबी सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने पराभव केला, पण या सामन्यांमध्ये सेहवाग टीममध्ये नव्हता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: MS Dhoni, Sachin tendulkar, Virender sehwag

    पुढील बातम्या