मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत सुरु असुन यापैकी कोणता संघ हा सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर भारताला गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. आता ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 172 धावा करून भारताला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे. भारत हे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरला तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये प्रवेश करेल.
भारताच्या गोलांजाना ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना बाद करण्यात यश आले होते. यात शिखा पांडे हिने 2 विकेट घेतल्या असून दिप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.