नवी दिल्ली, 17 मार्च : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, कार्यालये, सिनेमागृह, जिम आणि मैदाने संसर्ग टाळण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अर्थातच क्रिकेट सामनेही रद्द झाले आहेत. तर, आयपीएलचा तेरावा हंगामही पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंना घरात कैद केले जात आहे. कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं सर्व संघांनी आपले सराव सत्र रद्द केले आहेत. यातच दिल्ली कॅपिटल्सने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस पृथ्वी शॉसोबत डान्स करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडू डान्स करत असले तरी गाण्याचा आवाज येत नाही आहे. त्यामुळे दिल्ली संघाने चाहत्यांना कोणत्या गाण्यावर हे डान्स करत आहेत, हे ओळखण्यास सांगितले आहे.
Guess the song @ShreyasIyer15 & @PrithviShaw are dancing to 🕺
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2020
Wrong answers only 😉#YehHaiNayiDilli #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/JHOl7gx7Xf
यावर चाहत्यांनी विचित्र कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने श्रेयस कोरोना पळवण्यासाठी गो…कोरोना गाण्यावर डान्स करत असल्याचे ट्वीट केले आहे.
आयपीएल रद्द होणार? कोरोनाचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवरही झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेराव हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत. बीसीसीआयला होणार 10 हजार कोटींचे नुकसान आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला सगळ्यात मोठा दणका बसणार आहे. जर या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 10 हजार कोटी रुपयांचा मोठा तोटा होऊ शकेल. क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही रक्कम दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नव्हे तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रायोजकत्व, माध्यम हक्क, फ्रेंचायझी महसूल यांनाही कोट्यावधींचा तोटा होऊ शकतो