मुंबई, 20 मार्च : भारतीय संघात गेल्या काही वर्षात फिटनेसला महत्त्व दिले जात असून यासाठी योयो टेस्टही घेतली जाते. आता माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने योयो टेस्टबाबत मोठं विधान केलंय. "तुम्हाला जर धावणारा खेळाडू हवा असेल तर त्याला मॅरेथॉनमध्ये पळवा. क्रिकेट खेळवण्याची काय करज आहे." असं विरेंद्र सेहवागने म्हटलंय. ज्यावेळी विरेंद्र सेहवाग क्रिकेट खेळत होता तेव्हा संघात स्थान मिळवण्यासाठी अशी टेस्ट द्यावी लागत नव्हती.
सेहवागने न्यूज इंडियाच्या चौपाल व्यासपीठावर खेळाडूंच्या फॉर्मबाबत विचारलेल्या प्रश्नावर सेहवाग बोलत होता. त्याने म्हटलं की, आमच्यावेळी जिमची क्रेझ नव्हती. आम्ही मैदानावर जास्त वेळ घालवायचो. मला वाटतं की खेळाडूंनी कौशल्य दाखवलं पाहिजे. आजकाल योयो टेस्ट होत आहेत. तुम्ही कोणत्या खेळाडूला पळवून त्याचं कौशल्य कसं पाहू शकता. जर तुम्हाला त्याला पळवायचंच आहे तर मॅरेथॉनमध्ये पाठवा, क्रिकेट खेळवण्याची काय गरज असा सवाल सेहवागने केला.
ब्रेट लीने पुन्हा हातात घेतली गिटार, भज्जीच्या पंजाबी गाण्याला दिली साथ, Video
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमधील सामन्याबाबतही सेहवागने भाष्य केलं. तो म्हणाला भारत-पाकिस्तान सामना व्हायचा तेव्गहा वाटायचं की खेळाडूंमध्ये युद्ध सुरू आहे. पण आम्ही मैदानाबाहेर भेटायचो तेव्हा एक मित्र असायचो. पाकिस्तानी खेळाडू जेव्हा भारतात यायचे तेव्हा आम्ही त्यांना इथले पदार्थ खाऊ घालण्यासाठी आणि फिरायला न्यायचो. आम्ही तिकडे जायचो तेव्हा ते आम्हाला फिरायला न्यायचे असेही सेहवागने यावेळी सांगितले.
नजफगढबाबत आणि आपल्या बालपणीच्या आठवणींबाबतही सेहवाग बोलला. ते म्हणाला की, माझा जन्म नजफगढमध्ये झाला याचा मला अभिमान आहे. लहान असताना वडिलांनी मला क्रिकेट खेळायला नकार दिला होता. पण घरातील एका दुसऱ्या व्यक्तीने समजावून सांगितल्यानं वडिलांनी सेहवागला क्रिकेट खेळायला परवानगी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virender sehwag