मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ब्रेट लीने पुन्हा हातात घेतली गिटार, भज्जीच्या पंजाबी गाण्याला दिली साथ, Video

ब्रेट लीने पुन्हा हातात घेतली गिटार, भज्जीच्या पंजाबी गाण्याला दिली साथ, Video

ब्रेट लीने पुन्हा हातात घेतली गिटार, भज्जीच्या पंजाबी गाण्याला दिली साथ, Video

ब्रेट लीने पुन्हा हातात घेतली गिटार, भज्जीच्या पंजाबी गाण्याला दिली साथ, Video

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु असताना दुसरीकडे क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये पुन्हा आपला शानदार परफॉर्मन्स दाखवत आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटर हरभजनसिंह आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली यादोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर पारपडलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सने विजय झाला. एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु असताना दुसरीकडे क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये पुन्हा आपला शानदार परफॉर्मन्स दाखवत आहे.  यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटर हरभजनसिंह आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली यादोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये इंडिया महाराजा या संघाचा भाग असलेला हरभजन सिंह आणि वर्ल्ड जाएंट्स क्रिकेट संघाचा भाग असलेला ब्रेट ली हे दोघे मोकल्यावेळेत एकमेकांना संगीतात साथ देताना दिसले. ब्रेट ली याने हातात गिटार घेऊन एका पंजाबी गाण्याची धून वाजवली. यावर भज्जीलाही गाणं गुणगुणण्याचा मोह आवरला नाही. यावर भज्जीने पंजाबीतील सुप्रसिद्ध गाणं "मुंडिया तू बचके रही" गायलं यावेळी ब्रेट लीने हरभजनच्या या गाण्याला गिटार वाजवून साथ दिली. यासह पुन्हा एकदा ब्रेट लीने भारतीय चाहत्यांचे मन जिंकले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Harbhajan singh, India vs Australia