मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट, रोहितने नाही दिली संधी; धोनीच्या फेवरेट प्लेअरने केली कमाल

विराट, रोहितने नाही दिली संधी; धोनीच्या फेवरेट प्लेअरने केली कमाल

 विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली केदार जाधवला भारतीय संघातून खेळण्यासाठी अधिक संधी देण्यात आली नव्हती. परंतु केदारने द्विशतक झळकावून आपला दमदार खेळ दाखवल्यानंतर क्रिकेट रसिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेला मराठमोळा क्रिकेटर केदार जाधव याने रणजी क्रिकेटमध्ये जोरदार द्विशतक ठोकले आहे. आसाम आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान एलिट ग्रुप बी मध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात केदारने 283 चेंडूत 283 धावा ठोकल्या आहेत. द्विशतक करताना केदारने तब्बल 21 चौकार आणि 12 षटकार मारले. या द्विशतकातून केदार जाधवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केले आहे.

महेंद्र सिंह धोनी कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वाखाली केदार जाधव याने भारतीय संघात चांगले योगदान दिले होते. तसेच चेन्नई सुपरकिंगमधून आयपीएलच्या सामन्यातही केदारची खेळी लक्षवेधी ठरली होती. परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली केदार जाधवला भारतीय संघातून खेळण्यासाठी अधिक संधी देण्यात आली नव्हती. परंतु केदारने द्विशतक झळकावून आपला दमदार खेळ दाखवल्यानंतर क्रिकेट रसिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

हे ही वाचा : Happy Birthday Kapil Dev : कपिल देव यांनी कधीच टाकला नाही नो बॉल? काय आहे दाव्यामागचे सत्य

रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र संघाने आसाम संघा विरुद्ध 594 धावसंख्या केली. केदार जाधव सोबतच सिद्धेश वीर याने देखील 106 धावा करत शतक पूर्ण केले. केदार जाधव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात केदारची ट्रिपल सेंचुरी केवळ 17 धावांनी राहिली. केदार आतापर्यंत भारताकडून 73 वनडे आणि 9 इंटरनॅशनल सामने खेळला आहे. 2014 मध्ये पदार्पण करणाऱ्या केदारने 2020 मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Ranji Trophy, Rohit sharma, Virat kohli