जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शुभमनसाठी शार्दुलने केला मोठा त्याग, द्विशतक होण्याआधीचा VIDEO VIRAL

शुभमनसाठी शार्दुलने केला मोठा त्याग, द्विशतक होण्याआधीचा VIDEO VIRAL

शुभमनसाठी शार्दुलने केला मोठा त्याग, द्विशतक होण्याआधीचा VIDEO VIRAL

शुभमन गिल द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला असता. मात्र तेव्हा शार्दुल ठाकुरने स्वत: बाद होत शुभमनला पुढे खेळण्याची संधी दिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

हैदराबाद, 19 जानेवारी : भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकात 349 धावा केल्या. शुभमनने द्विशतक करताना अनेक विक्रमही केले. शुभमनच्या या द्विशतकामध्ये शार्दुल ठाकुरचंसुद्धा मोठं योगदान आहे. शार्दुलने शुभमनसाठी आपली विकेट दिली. भारतीय डावाच्या 47 व्या षटकात वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या चौथ्या चेंडूवर शुभमन गिलने एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. शुभमन शॉट खेळताच धाव घेण्यासाठी पळाला. नॉन स्ट्राइक एंडवरून शार्दुल क्रीजवरून बाहेर निघाला पण तो मागे फिरला. मात्र तोपर्यंत शुभमन गिलसुद्धा नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला होता. तर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लाथमने दुसऱ्या बाजूला स्टम्प उडवली होती. आता दोघांपैकी एकाला बाद व्हावं लागणार होतं. तेव्हा शार्दुल ठाकुर बाद झाला. सोशल मीडियावर यामुळे शार्दुल ठाकुरचे कौतुक केले जात आहे.

जाहिरात

हेही वाचा : VIDEO : हार्दिक पांड्या आऊट की नॉट आऊट? पंचांनी घेतली विकेट, नेटकरी संतापले शुभमन आणि शार्दुल दोघेही एका बाजूला पोहोचले होते तेव्हा शुभमन गिल 136 चेंडूत 169 धावांवर खेळत होता. तर शार्दुल 3 धावांवर होता. शुभमन बाद होण्यापासून वाचल्यानतंर त्याने पुढे 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. या खेळीत शुभमनने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. पुरुष एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात