नवी दिल्ली, 7 डिसेंबर: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेट स्वीकारल्याबद्दल आणि 'गेल्या 5 वर्षात फॉरमॅटचा बँड अॅम्बेसेडर' असल्याबद्दल कौतुक केले. तसेच त्यांनी तो या फॉरमॅटमध्ये का सर्वोत्तम आहे. याचा खुलासादेखील केला.
मुंबईत झालेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
रवी शास्त्री म्हणाले की, 'माझ्या मते गेल्या 5 वर्षात जर कोणता संघ कसोटी सामन्याचा अॅम्बेसेडर झाला असेल तर तो भारतीय क्रिकेट संघ आहे. विराट बहुतेक संघांप्रमाणेच कसोटी सामन्यांच्या क्रिकेटची पूजा करतो.
4 वर्षे भारताचे प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री लेखक जेफ्री आर्चर यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विराट आणि कसोटीचे असलेले नात सांगितले. ते म्हणाले, म्ही संघातील कोणालाही विचाराल तर त्यांच्यापैकी 99 टक्के लोक म्हणतील की त्याला कसोटी क्रिकेट आवडते. त्यामुळे भारताने गेल्या 5 वर्षात जे काही केले आहे, ते प्रत्येक वर्षाच्या शेवटी जगातील नंबर 1 संघ म्हणून कायम आहे.
शास्त्री यांच्यापूर्वी, माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) याने विराटला भारतातील सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार संबोधले आहे. इरफानने ट्वीट करत ‘विराटच्या नेतृत्त्वाखालील संघाने, सोमवारी वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडला ३७२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केल्यानंतर कसोटी मालिकेतही बाजी मारली आहे. जसे की, मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आताही सांगतोय, विराट भारतातील आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार आहे. तो 59.09 च्या विजयी सरासरीसह अव्वलस्थानावर आहे.’ अशा आशयामध्ये विराटचे कौतुक केले.
मुंबई कसोटी हा विराटचा कर्णधार म्हणून 66 वा सामना होता. या 66 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना त्याने 39 सामने जिंकले आहेत तर 16 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच उर्वरित ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. यासह त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताची विजयी सरासरी 59.09 इतकी झाली आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने 60 पैकी फक्त 27 कसोटी सामने जिंकले होते.
अशाप्रकारे विराटने भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे आणि त्याची विजयी सरासरीसुद्धा 50 टक्केपेक्षा जास्त राहिली आहे. तो भारताचा असा पहिला कर्णधार आहे, ज्याने 10 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले अन् त्याची विजयी सरासरी 50 टक्केंपेक्षा जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravi shastri, Test series, Virat kohli