मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat Kohli Viral Photos: विराट कोहलीच्या `त्या` व्हायरल फोटोजमुळे क्रिकेट रसिक संभ्रमात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Virat Kohli Viral Photos: विराट कोहलीच्या `त्या` व्हायरल फोटोजमुळे क्रिकेट रसिक संभ्रमात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Virat Kohli Viral Photos: विराट कोहलीच्या `त्या` व्हायरल फोटोजमुळे क्रिकेट रसिक संभ्रमात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Virat Kohli Viral Photos: विराट कोहलीच्या `त्या` व्हायरल फोटोजमुळे क्रिकेट रसिक संभ्रमात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Virat Kohli Viral Photos: भारत आणि ऑस्ट्रेलिया टीमदरम्यान पहिली टी-20 क्रिकेट मॅच मोहालीत खेळली जाणार आहे. या मॅचसाठी टीम इंडियाचे प्लेअर्स जोरदार सराव करत आहेत. यादरम्यान विराट कोहली एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

मुंबई, 20 सप्टेंबर: सध्या क्रिकेट जगतात अनेक घडामोडी घडत आहेत. अर्थात, या सर्व घडामोडींची क्रिकेट रसिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) आपल्या बॅटची जादू दाखवण्यात अपयशी ठरत होता. पण आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये विराटने दमदार खेळी करत आपण पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचा संदेश टीकाकारांना दिला आहे. खरं तर विराट क्रिकेट आणि खासगी गोष्टींमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्यादेखील एका वेगळ्याच गोष्टीमुळे विराट चर्चेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टीमदरम्यान पहिली टी-20 क्रिकेट मॅच मोहालीत खेळली जाणार आहे. या मॅचसाठी टीम इंडियाचे प्लेअर्स जोरदार सराव करत आहेत. याचदरम्यान नेट प्रॅक्टिसमध्ये विराट बॅटिंगसह बॉलिंगचीही  प्रॅक्टिस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे क्रिकेट रसिक काहीसे संभ्रमात पडले आहेत. विराट आता बॅटिंगसोबत बॉलिंगही करणार का, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आशिया कप स्पर्धेत दमदार खेळी करणारा टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहली आता ऑस्ट्रेलियन टीमला (Australia) जेरीस आणण्यासाठी सज्ज होत आहे. मंगळवारी मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचपूर्वी विराट केवळ बॅटिंगचाच नव्हे तर बॉलिंगचाही अभ्यास करत असल्याचं दिसून आलं आहे. आशिया कप स्पर्धा विराटसाठी खास राहिली. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर त्याने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं. या टुर्नामेंटमधील पाच डावांमध्ये विराटने 276 रन्स केल्या. तसंच दोन हाफ सेंच्युरी आणि एका सेंच्युरीचीही नोंद केली. हेही वाचा:Cricket: धक्कादायक... SA T20 लीग लिलावात दक्षिण आफ्रिकेचे कसोटी आणि वन डे कॅप्टन ठरले अनसोल्ड नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये विराट कोहली बॉलिंग करतानाही दिसला. हॉंगकॉंगविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने एक ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये विराटने सहा रन्स दिले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर चार विकेट्स (Wickets) आहेत. सध्या विराट ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचसाठी नेट प्रॅक्टिस करत आहे. यादरम्यान पंजाब क्रिकेट असोसिएशनने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली बॉलिंग करताना दिसत आहे. कोहलीचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली बॉलिंग करणार का, असा प्रश्न फॅन्स हे फोटोज शेअर करत विचारत आहेत. विराट कोहली हा टीम इंडियासाठी सहावा बॉलर म्हणून पर्याय ठरू शकेल, असं काही जणांचं म्हणणं आहे. विराट कोहली स्पिन बॉलिंग करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंगप्रमाणे विराटची बॉलिंगही कमाल करते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published:

Tags: Virat kohali, Virat kohli

पुढील बातम्या