केपटाऊन**, 19** ऑगस्ट**:** आगामी दक्षिण आफ्रिका टी20 लीगसाठी सध्या मेगा लिलाव सुरु आहे. केपटाऊनमघ्ये स्पर्धेतील सहा फ्रँचायझींमध्ये सर्वोत्तम टीम निवडण्यावरुन चढाओढ सुरु आहे. दक्षिण आफ्रिकन टी20 लीगला मिनी आयपीएल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आयपीएलच्याच सहा फ्रँचायझींनी या स्पर्धेत वेगवेगळे संघ विकत घेतले आहेत. त्याच संघमालकांकडून सध्या खेळाडूंवर बोली लावली जात आहे. पण लिलावाच्या पहिल्या राऊंडमध्ये एक अनोखी गोष्ट घडली. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आणि वन डे कर्णधारांना कोणत्याही फ्रँचायझीनं बोलीच लावली नाही.
डीन एल्गर अनसोल्ड दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि कसोटी-वन डे संघांचा कर्णधार डीन एल्गरची बेस प्राईज 10 हजार डॉलर्स इतकी होती. पण सहापैकी एकाही फ्रँचायझीनं एल्गरवर बोली लावली नाही. इतकच नाही तर एल्गरसह दक्षिण आफ्रिकेचा वन डे कॅप्टन टेम्बा बवुमालाही विकत घेण्यासाठी फ्रँचायझींनी रस दाखवला नाही. त्यामुळे लिलावाच्या पहिल्या राऊंडमधली ही धक्कादायक बाब ठरली.
If you haven't found a reason to be eXXcited, we invite you to watch the teams battle it out to get the services of 22 year old Tristan Stubbs.#SA20Auction #SA20 pic.twitter.com/Q3yrRP3Qp4
— Betway SA20 (@SA20_League) September 19, 2022
हेही वाचा - Roger Federer: बापरे! फेडररच्या शेवटच्या मॅचचं तिकिट हवंय? मग मोजावे लागतील इतके लाख रुपये… स्ट्रब्सला सर्वाधिक बोली दरम्यान दक्षिण आफ्रिकन टी20 लीग लिलाव प्रक्रियेत आतापर्यंत युवा फलंदाज ट्रिस्टन स्ट्रब्सला सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. सनरायझर्स संघानं 92 लाख खर्च करुन स्ट्रब्सला संघात विकत घेतलं आहे. याशिवाय रुसो, यान्सन आणि वेन पार्नेल हे इतर महागडे खेळाडू ठरले.