मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शेवटी शास्त्रींच्या तोंडी Virat च, टेस्ट कॅप्टन्सीवर Ravi Shastriनी सांगितली 'मन की बात'

शेवटी शास्त्रींच्या तोंडी Virat च, टेस्ट कॅप्टन्सीवर Ravi Shastriनी सांगितली 'मन की बात'

ravi shastri

ravi shastri

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) यांची जोडी चांगलीच यशस्वी ठरली. ही जोडगोळी नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत असतेच. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची सल अजूनही शास्त्रीच्या मनात तशीच आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 मार्च: माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) यांची जोडी चांगलीच यशस्वी ठरली. ही जोडगोळी नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत असतेच. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची सल अजूनही शास्त्रीच्या मनात तशीच आहे. त्यांनी एका मुलाखती दरम्यान, विराटबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता तर मला आवडले असते. अशी भावना शास्त्रींनी व्यक्त केली आहे.

59 वर्षीय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मन की बात सांगितली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला वाटते की (कर्णधारपद सोडणे) विराट कोहलीसाठी अप्रत्यक्षपणे फायदेशीर ठरू शकते. कर्णधारपदाचे दडपण त्याच्या खांद्यावरून उतरले आहे. कर्णधाराकडून जे अपेक्षित होते, ते आता होणार नाही. आता तो स्वत:ला चांगले व्यक्त करू शकतो, मोकळेपणाने खेळू शकतो आणि मला वाटते की त्यालाही ते करायला आवडेल.

तसेच ते पुढे म्हणाले, 'मला विश्वास आहे की त्याने कर्णधारपद सोडण्याचा योग्य निर्णय घेतला. मात्र, तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता तर मला आवडले असते. पण ही वैयक्तिक निवड आहे.' अशी भावना शास्त्रींनी यावेळी बोलून दाखवली.

कोहलीने आयपीएलच्या 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद अखेरचे स्वीकारले होते. आता तो फाफ डूप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे, तर आयपीएलमध्येही तो फलंदाज म्हणून खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता, तर यापूर्वी गेल्या वर्षीच्या विश्वचषकानंतर त्याने टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले.

First published:

Tags: BCCI, Ravi shashtri, Virat kohli