डॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला? विराटने सांगितलं

डॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला? विराटने सांगितलं

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि जगातील सर्वोत्तम बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) हा दिसायलाही सुंदर आहे. तो जसं मैदानावर त्याच्या फिटनेस आणि खेळाने प्रेक्षकांना आकर्षित करतो तसंच मैदानाबाहेरही त्याला अनेक फॅन्स आहेत. आता विराटचं लग्न झालेलं असलं तरीही लग्नापूर्वी भारतातीलच नव्हे तर, परदेशातील अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या.

  • Share this:

मुंबई, 18 मे : क्रिकेटपटूंच्या मैदानातलं आयुष्य आणि खासगी आयुष्य सगळ्या जगासमोर येत असतं. सध्या सोशल मीडियामुळे तर खासगी आयुष्याची पण जबरदस्त चर्चा नेटवर होत असते. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि जगातील सर्वोत्तम बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) हा दिसायलाही सुंदर आहे. तो जसं मैदानावर त्याच्या फिटनेस आणि खेळाने प्रेक्षकांना आकर्षित करतो तसंच मैदानाबाहेरही त्याला अनेक फॅन्स आहेत. आता विराटचं लग्न झालेलं असलं तरीही लग्नापूर्वी भारतातीलच नव्हे तर, परदेशातील अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या. असाच एक लग्नाआधीचा किस्सा विराट कोहलीने कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कपिल शर्माच्या(Kapil Sharma) शोमध्ये सांगितला होता.

2014 मध्ये ब्रिटिश महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने (Danielle Wyatt) सोशल मीडियावर जाहीरपणे विराट कोहलीला प्रोपज केलं होतं. त्यानंतर विराट कपीलच्या शोमध्ये उपस्थित होता. तेव्हा विराटला त्याचा आणि डॅनियलचा फोटो त्याला दाखवण्यात आला. त्यात डॅनियलच्या फोटोसमोर लिहिलं होतं, ‘विराट मला तुझ्याशी लग्न करायचंय.’ हा फोटो पाहून पहिल्यांदा विराट लाजला आणि त्यानंतर त्याने त्याबाबत स्पष्ट उत्तरच देऊन टाकलं. तो म्हणाला, ‘आम्ही 2014 मध्ये बांगलादेशात टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत (T-20 World Cup) खेळत होतो. सेमीफायनल मॅच झाल्यानंतर तिने हे ट्विट केलं होतं. पण मला दुसऱ्या दिवशी त्याबद्दल कळालं. नंतर आम्ही क्रिकेट सरावात गुंतलो आणि मी विसरून गेलो. पण मला नंतर समजलं की माझ्या आईने स्पष्ट केलं की, विराटचं अजून लग्नाचं वय झालेलं नाही. आईने थेट घरातूनच लग्नाला नकार दिला. मला बोलण्याची संधीच दिली नाही.’ एवढं सांगून विराट हसायला लागला.

विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Actress Anushka Sharma) यांची 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर ते दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं. विराट आणि अनुष्काला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली असून तिचं नाव वामिका ठेवलं आहे. त्यानंतर या दोघांनी आपल्या लाडक्या मुलीचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. विराट आणि अनुष्काचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन्स आहेत. त्यांना या जोडप्याविषयी जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. हे दोघंही सोशल मीडियावर अपडेट्स टाकत असतात.

First published: May 18, 2021, 10:13 PM IST

ताज्या बातम्या