जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: विराटच्या गळ्यातील रिंग का आहे खास? पाहा विराटनं विक्रमी शतकाचं क्रेडिट कुणाला दिलं?

Asia Cup 2022: विराटच्या गळ्यातील रिंग का आहे खास? पाहा विराटनं विक्रमी शतकाचं क्रेडिट कुणाला दिलं?

विराट कोहली

विराट कोहली

Asia Cup 2022: शतकानंतर विराटचं खास सेलिब्रेशन तीन वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विराटनं शतक झळकावताच गळ्यातील रिंग बाहेर काढली आणि तिला किस केलं. पण ही रिंग आणि विराटचं खास कनेक्शन काय आहे?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दुबई, 08 सप्टेंबर**:** टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटनं तब्बल एक हजार 21 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आणि किंग कोहलीनं विश्वचषकाआधी आपण फुल फॉर्ममध्ये आल्याची वर्दी दिली. शतकानंतर विराटचं खास सेलिब्रेशन तीन वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विराटनं शतक झळकावताच गळ्यातील रिंग बाहेर काढली आणि तिला किस केलं. पण ही रिंग आणि विराटचं खास कनेक्शन काय आहे? याचं उत्तर विराटनं इनिंग संपल्यानंतर दिलं. विराटचं लेडी लक विराटनं शतक साजरं केल्यानंतर गळ्यात घातलेली जी रिंग बाहेर काढली ती त्याची वेडिंग रिंग आहे. इनिंग संपवून विराट जेव्हा मैदान आला तेव्हा त्यानं स्वत:हून त्या सेलिब्रेशनविषयी सांगितली. गेल्या तीन वर्षात विराटनं फॉर्मशी मोठी झुंज दिली आहे. तीन वर्षात त्याच्या बॅटमधून शतकंच नव्हे तर धावांचा ओघही आटला होता. त्यावरुन टीकाही झाली. टी20 विश्वचषकातल्या पराभवानंतर आधी टी20 आणि वन डेचं कर्णधारपद गेलं. मग त्यानं कसोटी कर्णधारपदही सोडलं. या सगळ्या कठीण काळात अनुष्का शर्मानंच  विराटला साथ दिली. त्याच्या पाठीशी उभी राहिली. आणि म्हणूनच विराटनं या शतकाचं क्रेडिट अनुष्काला देताना तिला आणि मुलगी वामिकाला हे शतक डेडिकेट केलं. टी20त ‘विराट’ शतक टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं विराटचं हे पहिलं शतक ठरलं. त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 122 फटकावल्या. त्याच्या या शतकामुळे टीम इंडियानं 2 बाद 212 धावांचा डोंगर उभारला. दरम्यानं विराटनं याआधी आयपीएलमध्ये 5 शतकं ठोकली होती.

जाहिरात

रिकी पॉन्टिंगशी बरोबरी या शतकासह विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 71 वर पोहोचली आहे. त्यानं आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत रिकी पॉन्टिंगशी बरोबरी साधली आहे. या यादीत विराट आता सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात