जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ....तर टीम इंडियावर येईल मोठं संकट; कोहलीचा Fan असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरने व्यक्त केली खंत

....तर टीम इंडियावर येईल मोठं संकट; कोहलीचा Fan असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरने व्यक्त केली खंत

....तर टीम इंडियावर येईल मोठं संकट; कोहलीचा Fan असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरने व्यक्त केली खंत

विराट, चेतेश्वर यांनी इंग्लंडमध्ये सेंच्युरी (Century in England) ठोकायला हवी,’ असं मत पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकने (Inzamam ul- Haq) व्यक्त केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकने भारतीय क्रिकेटबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘मी भारतीय क्रिकेट टीमचा खेळ ऑस्ट्रेलियातील दौऱ्यापासून (Australia Tour) पाहतो आहे. प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीत या टीमने धैर्याने खेळ करून ऑस्ट्रेलियात विजय मिळवला होता. त्यामुळे या संघातील अनुभवी खेळाडूंनी पुढाकार घेऊन खेळायला हवं. कॅप्टन विराट कोहलीने (Captain Virat Kohli) दोन वर्षांपासून टेस्टमध्ये सेंच्युरी केलेली नाही. तसंच काहीसं चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेबाबत आहे. विराट, चेतेश्वर यांनी इंग्लंडमध्ये सेंच्युरी (Century in England) ठोकायला हवी,’ असं मत पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकने (Inzamam ul- Haq) व्यक्त केलं आहे. इंझमामने आपल्या यूट्युब चॅनेलवर सध्या सुरू असलेल्या भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेतील खेळाबाबात मत व्यक्त केलं आहे. सध्या सुरू असलेल्या भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेत (Ind Vs England Test Series) 1-1 अशी बरोबरी झाली असून चौथी टेस्ट मॅच 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या आधीच्या हेडिंग्ले येथे झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पुजाराने 91 तर विराटने 55 रन्स केल्या होत्या. आपल्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात इंझमाम म्हणाला, ‘भारताचं बॅटिंग लाइनअप तुम्ही पाहिलंत तर विराटने दोन वर्षं झाली टेस्ट सेंच्युरी केलेली नाही. पुजारा आणि रहाणेबाबत तशीच परिस्थिती आहे. ऋषभ पंतनी रन केले आहेत. रवींद्र जडेजा, आर. अश्विनने योगदान दिलं आहे. अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत तरुण खेळाडूंनी अधिक योगदान दिलं आहे. जगज्जेत्या इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सीरिजमध्ये जर भारताच्या अनुभवी खेळाडूंनी पुढे येऊन नेतृत्व केलं नाही तर सगळ्या टीमवर संकट येईल.’

    Tokyo Paralympics : गोल्ड मेडल जिंकताच पंतप्रधानांचा फोन, सुमित झाला इमोशनल

    इंझमाम उल हकने त्याचा काळ गाजवला आहे. तो पाकिस्तानच्या महान बॅट्समनपैकी एक आहे. तो यूट्यूब चॅनेलच्या कार्यक्रमातून क्रिकेटबद्दल आपलं मत मांडत असतो.

    ‘आयुष्याचा एक भाग निघून गेला’, सचिन तेंडुलकर झाला इमोशनल

    या कार्यक्रमात तो म्हणाला, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून मी त्यांचा खेळ पाहतो आहे. त्यांनी खूप चांगलं टेस्ट क्रिकेट खेळलं आहे. भारतीय संघ या सीरिजमध्ये कठीण परिस्थितीतून बाहेर पडला होता पण त्यात तरुण खेळाडूंचं योगदान अधिक होतं. कोहली जगातला एक क्रमांकाचा खेळाडू आहे. पुजारा आणि रहाणे चांगले टेस्ट खेळाडू आहेत, पण त्यांच्या दोन सेंच्युरींमध्ये इतकं अंतर पडणार असेल तर तरुण खेळाडूंवर ताण निर्माण होईल.’ असं मत इंझमाम उल हकने व्यक्त केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात