टोकयो, 30 ऑगस्ट : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic) भारताची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सोमवारी भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) F64 क्लास इव्हेंटमध्ये सुमित आंतिलला (Sumit Antil) गोल्ड मेडल मिळालं आहे. सुमित आंतिल याने दोन विश्वविक्रमी थ्रो केले, यामध्ये 68.55 मीटरचा थ्रो सगळ्यात लांब होता. सुमित आंतिलच्या या गोल्डन कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्याच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधानांनी सुमितला त्याच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या, तसंच तू देशाचं नाव मोठं केलं आहेस. देशातल्या तरुणांना यामुळे प्रेरणा मिळेल, असं मोदी सुमितसोबत संवाद साधत असताना म्हणाले.
That special moment
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 30, 2021
when India’s 🇮🇳 Prime Minister
calls to congratulate you…
Just after you’ve won the #Paralympics
GOLD🥇 and broken the world record…
Well Done Sumit Antil !#Praise4Para #Cheer4India
| @narendramodi @Media_SAI @PIB_India | pic.twitter.com/pZapR2bbAm
सुमित आंतिलच्या या मेडलसह आता टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 7 मेडल झाली आहेत. भालाफेक स्पर्धेतच भारताला तीन मेडल मिळाली आहेत. भालाफेकमध्ये देवेंद्र झझारियाला (Devendra Jhajharia) सिल्व्हर मेडल, भालाफेकमध्येच सुंदर सिंगला (Sundar Singh) ब्रॉन्झ मेडल मिळालं. शूटर अवनी लेखरा (Avani Lekhara) हिला गोल्ड मेडल, डिस्कस थ्रोमध्ये योगेश कठुनियाला (Yogesh Kathuniya) सिल्व्हर मेडल, भविनाबेन पटेलला (Bhavinaben Patel) टेबल टेनिसमध्ये सिल्व्हर मेडल, आणि उंच उडीमध्ये निशाद कुमारला (Nishad Kumar)सिल्व्हर मेडल मिळालं. टोकयो पॅरालिम्पिकमधलं भारताचं एक पदक रद्द करण्यात आलं. डिस्कस थ्रोमध्ये विनोद कुमार (Vinod Kumar) याला रविवारी ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. विनोद कुमारचं मेडल क्लासिफिकेशन समितीने रद्दबातल केलं आहे.