मुंबई, 15 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात किंग कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. विराट कोहलीचे हे 74 वे शतक असून तो श्रीलंका विरुद्ध एकाच वनडे सामन्यात लागोपाठ दोन शतक करण्यास यशस्वी ठरला आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने गुवाहाटीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यातही विस्फोटक फलंदाजी करून 80 चेंडूत त्याने शतक ठोकले होते. विराटने त्याच्या 74 व्या शतकासह सचिन तेंडुलकर याचा मोठा रेकॉर्ड मोडीत काढला. भारताने श्रीलंका विरुद्ध तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यात फलंदाजी करताना किंग कोहलीने देखील शतक ठोकून पुन्हा एकदा गर्जना केली. विराटने 85 चेंडूत नाबाद शतक ठोकले आहे. विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात 160 सामन्यांमध्ये 20 वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ 101 सामन्यात 21 वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंग याचा ही मायदेशातील 151 सामन्यात 14 वेळा शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यात श्रीलंका विरुद्ध तब्बल 10 वेळा शतक केली आहेत. विराटाचे वनडे सामन्यातील हे 46 वे शतक होते. याच सह विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.