भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्कासह मुलगी वामिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृंदावनमधील हा व्हिडीओ आहे. विराट कोहली कुटुंबासह स्वामी प्रेमानंदजी महाराज यांच्या आश्रमात गेला होता. यावेळी स्वामी प्रेमानंदजी यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात विराट - अनुष्का यांची मुलगी वामिकासुद्धा दिसते.
विराट कोहलीला सध्या विश्रांती देण्यात आली असून तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला विराट कोहली दुबईला गेला होता. आता तो भगवान कृष्णाची नगरी असलेल्या मथुरा-वृंदावनात पोहोचला आहे. त्याने आश्रमाला भेट दिली आणि स्वामीजींचे आशीर्वादही घेतले.
Virat's Vrindavan Visit "Bhartiya cricket team ke Kaptaan" I wish he still be the Captain of #IndianCricketTeam.#INDvSL #BoycottPathaan #HardikPandya pic.twitter.com/3SEVhvyHFy
— BALIDAN4INDIA (@peacei24) January 6, 2023
हेही वाचा : गोलंदाजांच्या चुकांची प्रशिक्षक राहुल द्रविडने केली पाठराखण, पराभवावर दिली प्रतिक्रिया
स्वामीजींना विराट आणि अनुष्का यांची ओळख एकाने करून दिली. त्यानंतर स्वामीजी आश्रमातील एका भक्तामार्फत चुनरी आणि कोहलीला हार घालण्यास सांगतात. यावेळी विराट - अनुष्कासोबत मुलगी वामिकासुद्धा दिसते. स्वामीजी त्यावेळी लहान मुलीलासुद्धा कुणीतरही फुलांची माळ घाला असं म्हणतात.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करेल. टी२० वर्ल्ड कपमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बांगलादेश दौऱ्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराटशिवाय रोहित शर्मा आणि केएल राहुल पुनरागमन करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Cricket, Virat kohli