• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्वारंटाइन संपताच 'विरुष्का'नं असं केलं येणाऱ्या नव्या पाहुण्याचं सेलिब्रेशन, पाहा VIDEO

क्वारंटाइन संपताच 'विरुष्का'नं असं केलं येणाऱ्या नव्या पाहुण्याचं सेलिब्रेशन, पाहा VIDEO

संघाचा क्वारंटाइन संपल्यानंतर RCB संघानं आपल्या कर्णधारासाठी एक खास सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 • Share this:
  दुबई, 30 ऑगस्ट : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल खेळण्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. मात्र विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Banglore) संघासोबत नाही तर चार्टड प्लेननं पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anuska Sharma) युएइ पोहचला आहे. याआधी विराट कोहलीनं शुक्रवारी सोशल मीडियावर अनुष्का प्रेग्नेंट असल्याचे सांगत, जानेवारी 2021मध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. अनुष्काही विराटसोबत युएइला दाखल झाली. संघाचा क्वारंटाइन संपल्यानंतर RCB संघानं आपल्या कर्णधारासाठी एक खास सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाचा-प्रेम, ब्रेकअप ते आता आई-बाबा! वाचा आदर्श कपल असलेल्या 'विरुष्का'ची Lovestory अनुष्का-विराटनं संघासोबत कापला केक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट एकत्र केक कापताना दिसत आहे. यावेळी आरसीबीचा संपूर्ण संघ उपस्थित होता. केक कापल्यानंतर अनुष्कानं विराटला किस केले. दरम्यान, यावेळी संघातील खेळाडूंनी विराटकडे संपूर्ण क्रिकेट टीम तयार कर, असा सल्ला दिला. वाचा-विराट-अनुष्कानं दिली GOOD NEWS! जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा चहलच्या साखरपूड्याचेही झाले सेलिब्रेशन कोहलीसोबतच फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहललाही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. युएइ येण्याआधी चहलनं युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मासोबत साखरपूडा केला. या व्हिडीओमध्ये चहललं केक कापताना दिसत आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: