विराट-अनुष्कानं दिली GOOD NEWS! जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा

विराट-अनुष्कानं दिली GOOD NEWS! जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा

आता विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आदर्श जोडींपैकी एक मानली जाते. आता विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर करत, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन देत. जानेवारी 2021 ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले. विराटनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे.

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏 pic.twitter.com/0BDSogBM1n

विराट आणि अनुष्का यांचा विवाह डिसेंबर 11, 2017 रोजी इटलीमध्ये झाला. मोजक्या लोकांसह विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये विराट-अनुष्काची जोडी विरुष्का म्हणून प्रसिद्ध आहे.

विराट सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएइला आला असून अनुष्का मुंबईत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विराट-अनुष्का एकत्र मुंबईतील त्यांच्या घरी होते. याकाळात दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. याचे फोटो आणि व्हिडीओ विराट-अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असतं. विराट आणि अनुष्कानं दिलेले हे सरप्राइज चाहत्यांसाठी खास आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2020, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या