सिडनी, 22 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गुरुवारी (19 डिसेंबर) लिलाव झाला. या लिलावात मुंबई इंडियन्सनं इतर संघाच्या तुलनेत कमी रकमेची बोली लावली. मात्र त्यांनी विकत घेतलेले सगळे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सनं लिलावात सर्वात आधी कोलकात नाईट रायडर्सनं रिलीज केलेल्या ख्रिस लिनला 2 कोटींना विकत घेतले. लिलावानंतर काही दिवसांनी लगेचच लिननं आणखी एक वादळी खेळी केली. बिग बॅश लीगच्या 9व्या सामन्यात ब्रिस्बेन हीट्सचा कर्णधार ख्रिस लिनने आपल्या बॅटने विरोधी गोलंदाजांवर कडकडाट केला. सिडनी क्रिकेट मैदानावर लिनने सिडनी सिक्सर्सविरुद्ध 35 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी केली. लिनला शतक हुकले असले तर, त्याने आपल्या अतुलनीय खेळीने सर्वांची मने जिंकली. लिनच्या या खेळीत 11 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. म्हणजेच लिनने 94 धावांमधील 82 धावा षटकार आणि चौकारांसह केल्या. या सामन्यात ख्रिस लिनचा स्ट्राइक रेट 268.57 होता. वाचा- पंत पुढे खेळाडूंनी टेकले हात! सलग तीन कॅच सोडण्याची लाजीरवाणी कामगिरी
Another one. Five sixes now for @lynny50. This is wild! #BBL09 pic.twitter.com/jHndF3R74n
— KFC Big Bash League (@BBL) December 22, 2019
वाचा- वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट सिडनीमध्ये लिनचे ‘वादळ’ सिडनी सिक्सर्सनं टॉस जिंकत ब्रिस्बेन हीटला फलंदाजी करण्यास सांगितले. दुसर्या षटकात सिडनीला मॅक्स ब्रायंटची विकेट मिळाली. दुसर्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शॉन अॅबॉटने त्याला बाद केले. यानंतर ख्रिस लिनने क्रीजवर प्रवेश केला आणि सिडनी गोलंदाजांची शाळा घेतली.
वाचा- VIDEO : मॅक्सवेलची कमाल! मैदानावरच्या खेळाडूंनी नाही तर थेट पंचांनी पकडला कॅच अशा प्रकारे लिनने 11 षटकार लगावले दुसर्या बॉलवर षटकार मारत लिनने आपले आक्रमक हेतू स्पष्ट केला. यानंतर त्याने डवर्सियसच्या ओव्हरमध्ये षटकार मारला. चौथ्या षटकात लिनने एक षटकार ठोकला आणि पाचव्या षटकात टॉम कुरनच्या ओव्हरमध्ये त्याने सलग 2 षटकार मारत संघाला चांगली सुरुवात करुन केली. लिनने आपले अर्धशतक अवघ्या 20 चेंडूत पूर्ण केले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकातही लिनने षटकार खेचला आणि संघाला 6 षटकांत 73 धावा केल्या.

)







