Home /News /sport /

'विराटने पंतसोबत तसं करू नये', सेहवागचा धोनीवर गंभीर आरोप

'विराटने पंतसोबत तसं करू नये', सेहवागचा धोनीवर गंभीर आरोप

पंतला टी20 मध्ये संधी न मिळाल्यानं सेहवागने संघाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला.

    नवी दिल्ली, 02 जानेवारी : मुंबईत 14 जानेवारीला झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या डोक्याला चेंडू लागला. यानंतर त्याला एका सामन्यात विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, भारतीय संघाने त्याला पुढच्या टी20 मालिकेतही विश्रांती दिली. टी20 मालिकेत केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पंतला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळालेली नाही. यावरून आता भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. पंतला संघाबाहेर ठेवलं तर तो धावा कशा करणार असा सवाल सेहवागने विचारला आहे. पंतला टी20 मध्ये संधी न मिळाल्यानं सेहवागने संघाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. सेहवाग म्हणाला की, सचिन तेंडुलकरलासुद्धा बाहेर बसवलं तर त्यालाही धावा करता येणार नाहीत. बाहेर बसून फक्त पाणीच पाजू शकतो. कोहली स्वत: म्हणतो की तो एक मॅच विनर आहे पण त्याला संधी देत नाही. तो फॉर्ममध्ये नसल्यानं असं केलं जात आहे अशीही चर्चा आहे. सेहवाग म्हणाला की, पंत तीनही प्रकारात खेळतो. अशावेळी कोणताही खेळाडू एका प्रकारात अपयशी ठरू शकतो. विराट बहुतेक खेळाडूंशी बोलत नसावा असंही सेहवागने म्हटलं. आमच्यावेळी सौरव गांगुली, अनिल कुंबळे, राहुल द्रविड हे खेळाडूंशी चर्चा करायचे. मला नाही माहिती विराट कोहली असं करतो की नाही. मात्र रोहित शर्मा आशिया कपमध्ये कर्णधार असताना तो खेळाडूंशी बोलायचा. माध्यमांसमोर कर्णधार जे बोलतो तेच त्या खेळाडूसोबत बोलणं महत्वाचं असल्याचंही विरेंद्र सेहवागने सांगितलं. सेहवागने धोनीच्या नेतृत्वाकडे बोट दाखवताना गंभीर आरोप केला की, धोनी माध्यमांसमोर एक बोलायचा आणि संघाच्या बैठकीत वेगळंच सांगायचा. एका सामन्यात टॉप 3 पैकी एक खेळाडू बाहेर बसेल आणि रोहित शर्मा त्यात खेळेल असं ठरलेलं असताना धोनीने माध्यमांसमोर म्हटलं की, तीनही खेळाडूंचे क्षेत्ररक्षण मंदावले आहे. जर सध्याच्या भारतीय संघातही हे होत असेल तर चुकीचं आहे. सुपर ओव्हरची हॅट्ट्रिक! 4 दिवसात तिसऱ्यांदा रंगला थरार, पाहा VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या