नवी दिल्ली, 01 जानेवारी : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत वाढणारी सामन्याची रंगत हल्ली सुपर ओव्हरच्या थरारापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यातच गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या फायनलने त्यावर कळस चढवला होता. आताही बारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सलग दोन सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरने लागला आहे. दरम्यान, यानंतर आणखी एक सामना सुपर ओव्हर झाला. गेल्या चार दिवसातील हा तिसरा सुपर ओव्हर मुकाबला ठरला. भारताने 29 आणि 31 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये जिंकून इतिहास रचला. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला तिरंगी टी20 मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिलांचा सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला. तिरंगी मालिकेतील सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 156 धावा केल्या. संघाची कर्णधार हीदर नाइटने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तिने 45 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 8 बाद 156 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर बेथ मूनीने 45 चेंडूत 65 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 3 षटकांत 40 धावा हव्या असताना सदरलँड आणि वेरेहॅमने फटकेबाजी केली. मात्र अखेरच्या षटकात 12 धावा हव्या असताना 11 धावाच करता आल्या. यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी केली. त्यांना फक्त 8 धावाच करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने चार चेंडूत हे आव्हान पूर्ण करत विजेतेपद पटकावलं. इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने सलग दोन चौकार मारून विजय मिळवून दिला. VIDEO पाहून म्हणाल, अरे हा तर आर. अश्विनचा भाऊ! पाकचा फलंदाज झाला अवाक्

)







