नवी दिल्ली, 9 मार्च : टीम इंडियातून (Team India) मिळालेला डच्चू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) चांगलाच जिव्हारी लागला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) सौराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वी शॉ याने 123 बॉलमध्ये नाबाद 185 रनची खेळी केली. यात 7 सिक्स आणि 21 फोरचा समावेश होता. पृथ्वी शॉच्या या खेळीमुळे मुंबईने सौराष्ट्रचा 9 विकेटने पराभव केला आहे. सोबतच मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सौराष्ट्रने ठेवलेलं 285 रनचं आव्हान मुंबईने 41.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने 104 बॉलमध्ये 75 रन केले, तर आदित्य तरेने 24 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले. श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 साठी टीम इंडियामध्ये गेल्यामुळे पृथ्वी शॉकडे मुंबईचं नेतृत्व होतं.
या मॅचमध्ये सौराष्ट्रने टॉस जिंकत पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 284-5 एवढ्या स्कोअरपर्यंत मजल मारली. समर्थ व्यास याने नाबाद 90 रन तर चिराग जानीने नाबाद 53 रन केले. विश्वराज जडेजानेही 53 रनचीच खेळी केली. मुंबईकडून शम्स मुलानीने 2 विकेट घेतल्या, तर शिवम दुबे, तनुष कोटियन आणि प्रशांत सोळंकी यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
पृथ्वी शॉ याने याआधी पुदुच्चेरीविरुद्धच्या मॅचमध्ये द्विशतकही केलं होतं. यंदाच्या मोसमात विजय हजारे ट्रॉफीच्या सगळ्या 6 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. आता सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना कर्नाटकशी होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने दिल्लीचा 7 विकेटने, महाराष्ट्राचा 6 विकेटने, पुदुच्चेरीचा 233 रननी, राजस्थानचा 67 रननी आणि हिमाचल प्रदेशचा 9 विकेटने पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Mumbai, Prithvi Shaw, Sports, Team india, Vijay hazare trophy