जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्पेशल फॅनसोबत पुजाराचा VIDEO व्हायरल, इंग्लंडमध्ये ठोकले त्रिशतक

स्पेशल फॅनसोबत पुजाराचा VIDEO व्हायरल, इंग्लंडमध्ये ठोकले त्रिशतक

स्पेशल फॅनसोबत पुजाराचा VIDEO व्हायरल, इंग्लंडमध्ये ठोकले त्रिशतक

संपूर्ण जग सध्या आयपीएलने (IPL) वेढले आहे, पण आयपीएलपासून दूर असलेल्या चेतेश्वर पुजाराची(Cheteshwar Pujara) बॅट इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 मे: संपूर्ण जग सध्या आयपीएलने (IPL) वेढले आहे, पण भारताचा धडाकेबाज फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)आयपीएलपासून दूर इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये चमक दाखवत आहे. पुजारा इंग्लंडमध्ये धावा करत आहे, जिथे त्याने आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत आणि दोन द्विशतकांनंतर शतकही केले आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची स्पेशल फॅन पाहायला मिळत आहे. चेतेश्वर पुजारा नेहमीच त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या इंग्लंडमध्ये फटकेबाजी करताना दिसत आहे. अशातच हे सामना पाहण्यासाठी पत्नी पूजा पुजारा आणि मुलगी अदिती यांनी इंग्लंडमध्ये उपस्थिती लावली आहे. सामन्यानंतर पुजार आणि त्याच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर पुजारा आपल्या मुलीला हाय फाइव्ह देताना दिसत आहे. पुजाराने हाच व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि खास कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘‘मैदानावर चांगला दिवस आल्यानंतर अदितीकडून हाय-फाइव्हपेक्षा काहीही चांगले नाही’’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

जाहिरात

चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये पाच डावांत 3 शतके झळकावली आहेत. यादरम्यान पुजाराने ससेक्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 6 आणि 201 धावा केल्या होत्या, ज्यामुळे डर्बीशायरविरुद्ध फॉलोऑन मिळाल्यानंतर संघाने सामना अनिर्णित ठेवला. त्यानंतर पुजाराने वूस्टरशायरविरुद्ध 109 आणि 12 धावांची खेळी खेळली. या सामन्यात मात्र त्यांच्या संघाला 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कौंटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या विभागातील डरहमविरुद्धच्या या चार दिवसीय सामन्यात पुजारा शनिवारी 334 चेंडूत 203 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, त्याची बॅट इंग्लंडच्या मैदानात चांगलीच तळपत आहे. तो इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी संघात पुनरागमन करू शकतो. पुजाराने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pujara
  • First Published :
जाहिरात
जाहिरात