मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /महिला IPLचे मीडिया राइट्स Viacom18ने जिंकले, 951 कोटींची लावली बोली

महिला IPLचे मीडिया राइट्स Viacom18ने जिंकले, 951 कोटींची लावली बोली

महिला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क Viacom18 ने विकत घेतले आहेत. सोमवारी लिलावात पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांची बोली लावली.

महिला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क Viacom18 ने विकत घेतले आहेत. सोमवारी लिलावात पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांची बोली लावली.

महिला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क Viacom18 ने विकत घेतले आहेत. सोमवारी लिलावात पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांची बोली लावली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 16 जानेवारी : महिला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क Viacom18 ने विकत घेतले आहेत. सोमवारी लिलावात पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांची बोली लावली. पाच वर्षात आयपीएलमध्ये होणाऱ्या सामन्यांची संख्या पाहता प्रत्येक सामन्यासाठी ७.०९ कोटी रुपये इतके असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी ट्विटरवरून याची माहिती दिली.

वायकॉम १८ ने प्रक्षेपणाचे हक्क ९५१ कोटी रुपये बोली लावून जिंकले आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी प्रत्येक सामन्यासाठी सरासरी ७.०९ कोटी रुपये इतके मूल्य असेल. महिला क्रिकेटसाठी ही बाब खूपच मोठी असल्याचंही जय शहा यांनी म्हटलं. तसंच महिला आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवल्याबद्दल जय शहा यांनी वायकॉम१८ चे अभिनंदन केलं.

हेही वाचा : आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर?

याआधी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या खेळाडूंइतकेच महिला खेळाडूंना मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआय़ने घेतला होता. त्यानंतर महिला आयपीएलसाठी लागलेली इतकी बोली ही महिला क्रिकेटच्या सक्षमीकरणासाठी हे निर्णायक असं पाऊल आहे. सर्व वयोगटातील महिला खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी मदत होईल. ही एक नवी पहाट असल्याचं जय शहा म्हणाले.

महिला आयपीएलच्या प्रक्षेपणाच्या हक्कासाठी  डिजनी स्टार, सोनी आणि झी या स्पर्धकांना मागे टाकत वायकॉन १८ने बाजी मारली. सध्या नेटवर्क १८ची मालकी असलेल्या वायकॉम १८कडे पुरुषांच्या आय़पीएलसह दक्षिण आफ्रिकेत सुरु असणाऱ्या SA20 लीगच्या प्रक्षेपणाचेही अधिकार आहेत.

First published:

Tags: Cricket, IPL 2023