जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर?

आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर?

आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर?

महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये पंचांनी महेंद्र गायकवाडला दिलेल्या चार गुणांवरून वाद सुरू झाला आहे. यावर आता सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर, 16 जानेवारी : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून पराभूत व्हावं लागलं. यात पंचांनी महेंद्र गायकवाडला दिलेल्या चार गुणांवरून वाद सुरू झाला आहे. यावर आता सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे. टांग लावली पण ती परफेक्ट नव्हती. त्याला दोन पॉइंट आणि मला एक पॉइंट द्यायला पाहिजे होता असं सिकंदरने म्हटलंय. माझी कुस्ती महेंद्र गायकवाडसोबत होती. तीस सेकंदाची वॉर्निंग दिली तेव्हा एक पॉइंट त्याच्या खात्यात गेला. दुसऱ्या हाफमध्ये माझे त्याच्यावर तीन पॉइंट झाले. त्यानंतर १-३ अशी कुस्ती सुरू होती. जेव्हा त्याने टांग लावली पण ती परफेक्ट बसली नाही. पूर्णपणे कमरेचा कब्जा माझ्या हातात होता. टांग माझी एका साइडला खांद्यावर पडलीय असं सिकंदर म्हणाला. पंचांनी चार पॉइंट दिल्याच्या निर्णयावर बोलताना सिकंदर म्हणाला की, चार पॉइंट द्यायचे असतील तर डेंजर पोजिशन पाहिजे. पूर्णपणे पाठीवर पडला तर चार पॉइंट असतात. मी एका अंगावर आहे, कब्जा माझा आहे. इथं त्याला दोन पॉइंट द्यायला पाहिजेत आणि मला एक पॉइंट द्यायला पाहिजे. पण त्यांनी चार एक दिला. हेही वाचा :  सिकंदरवर अन्याय झाला, इतर पैलवानांवर होऊ नये; आई-वडिलांनी दिली प्रतिक्रिया महाराष्ट्रात सर्वांना कुस्ती कळते. अन्याय झालाय की नाही हे दिसतंय समोर. व्हिडीओसुद्धा त्याचा व्हायरल होतोय. तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलंय ते कायम राहूद्या. आज ना उद्या मी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून दाखवेन असा विश्वासही सिकंदरने व्यक्त केला. सिकंदरच्या प्रशिक्षकांनी म्हटलं की, कुस्तीचं पुन्हा रिव्ह्यू व्हावा असं म्हणणं होतं आणि निष्पक्ष निर्णय घ्यावा. पॉइंट होत असतील तर द्या. तेव्हा रेफ्रींनी चार पॉइंट दिले. तेव्हा जर चार पॉइंट दिले नसते तर सिकंदर जिंकला असता. सिकंदरचे वडील म्हणाले की, आम्ही सिकंदरला हमाली करून मोठं केलं. दिवसरात्र काबाडकष्ट करून पैलवान केलं. सिकंदरनेसुद्धा दिवसरात्र एक करून सराव केला. उपांत्य फेरीत त्याला कमी गुण दिले हे निंदनीय आहे. आमच्या मुलावर अन्याय झाला तसा इतर पैलवानावर होऊ नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wrestler
  • First Published :
जाहिरात
जाहिरात