मुंबई, 10 मार्च : भारतीय क्रिकेट टीममध्ये एक असा बॅट्समन आहे, ज्याचा साधेपणा आणि शिस्त अनेकांना आवडते. जेव्हा तो मैदानावर उतरतो तेव्हा सर्वात धोकादायक फास्ट बॉलरलादेखील या खेळाडूला कसं त्रस्त करायचं हे लवकर समजत नाही. भारताचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं या खेळाडूला टीममधील सर्वांत सज्जन आणि धार्मिक खेळाडू म्हटलं आहे. या खेळाडूनं गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीमसाठी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत टेस्ट सीरिजमध्ये एकदा नव्हे तर दोनदा पराभूत करण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. भारतीय टीमच्या या विजयात चेतेश्वर पुजाराचं सर्वांत महत्त्वाचं योगदान होतं. टीम इंडियाची नवीन ‘वॉल’ अशी ओळख असलेल्या पुजारानं ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सचे बाउन्सर सहन करत विजयाचा पाया रचला होता. बॉलर्सनी त्याला बाद करण्याचे कितीतरी प्रयत्न केले तरी तो एखाद्या खडूस व्यक्तीसारखा जागचा हलला नाही. त्यानं जास्तीत जास्त चेंडूचा बचाव करून ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सचा मारा निष्प्रभ ठरवला होता. CSKने 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला धोनीचा VIDEO; चाहत्यांची धडधड वाढली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान कारकिर्दीतील 100 वी टेस्ट मॅच खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा दिल्लीत माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुजारा भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळतो. शिस्तप्रिय जीवनशैलीमुळे त्यानं हा टप्पा गाठला आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 19 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीला एका कार्यक्रमादरम्यान भारतीय टीममधील सर्वांत साध्यासरळ स्वभावाच्या खेळाडूबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यानं चेतेश्वर पुजाराचं नाव घेतलं होतं. कोहलीनं सांगितलं होतं की, पुजारा कधीही कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेनं पाहत नाही. चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघातील सर्वात धार्मिक खेळाडू आहे. तो दिवसातून पाच वेळा देवाची पूजा करतो. पुजाराच्या पत्नीचं नावही पूजा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये पुजारानं चार मॅचमध्ये पाच डावात एकूण 98 रन्स केले आहेत. पुजारानं इंदूर टेस्ट मॅचच्या दुसऱ्या डावात 59 रन्सची संघर्षपूर्ण खेळी करत टीमला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या सीरिजमध्ये त्याला आपल्या नेहमीच्या शैलीत बॅटिंग करता आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.