कीर्तिपुर, 12 फेब्रुवारी : एकदिवसीय सामने हे 50-50 ओव्हरचे असतात पण नुकत्याच एका सामन्यात एक अजब प्रकार घडला. 50 ओव्हरचा सामना चक्क 20 ओव्हरआधीच संपला. आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीगच्या नेपाळ आणि अमेरिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. यामध्ये दोन्ही संघांनी एकूण 17.2 षटकांचा खेळ केला. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 35 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेपाळने 5.2 ओव्हरमध्ये 268 चेंडू शिल्लक असताना दोन विकेट गमावून हे लक्ष्य पार केले.
नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने सहा षटकांत 16 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील हा सर्वात धावसंख्येचा विक्रम आहे. यापूर्वी 2004 मध्ये श्रीलंकेने झिम्बाब्वेला 35 धावांतच बाद केले होते.
वाचा-भारत-पाक मालिका झाली तरच..., सिक्सर किंग युवराज सिंगचे धक्कादायक विधान
12 धावांतच गमावल्या 9 विकेट
या सामन्यात नेपाळने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेकडून झेविअर मार्शल आणि हॉलंड यांनी सलामीला फलंदाजी केली. पण हॉलंड खाते न उघडताच बाद झाला. यानंतर, झेविअरने पुढाकार घेतला आणि 6 षटकांत ही धावसंख्या 23 धावांवर नेली, त्याने संघासाठी सर्वाधिक 16 धावा केल्या. यानंतर कोणताही खेळाडू क्रीजवर टिकू शकला नाही. संदीप लामिछाने व सुशान भारिसमोर अमेरिकेचा संघ जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही.
वाचा-स्मृती मांधनाची एकाकी झुंज अयशस्वी! भारताने 11 धावांनी गमावली ट्राय सीरिज
USA ARE ALL OUT FOR 35
Sandeep Lamichhane picks up six wickets while Sushan Bhari chips in with four as Nepal dismiss the visitors for the joint-lowest ODI score.
What a show from the hosts!#CWCL2 | #RoadToCWC23 pic.twitter.com/CCu1OFySsm
— ICC (@ICC) February 12, 2020
वाचा-मुंबईकर श्रेयस अय्यर विराटपेक्षा सरस! न्यूझीलंडच्या भूमीत रचले वर्ल्ड रेकॉर्ड
17.2 ओव्हरमध्ये संपला सामना
हा एकदिवसीय सामना होता, पण त्याचा निकाल 17.2 षटकांत लागला. अमेरिकेच्या संघाने फलंदाजी करताना 12 षटकांत 35 धावांचे आव्हान ठेवले, तर नेपाळने केवळ 5.2 ओव्हरमध्ये हे आव्हान पार केले. अमेरिकेचा डाव 72 चेंडूंमध्ये संपला. यापूर्वी 2017 मध्ये अफगाणिस्तानाविरूद्ध झिम्बाब्वेचा संघ 83 चेंडूत 54 धावा देऊन बाद झाला होता.
आयपीएलमध्ये संदीप लामिछेनची कामगिरी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये नेपाळचा लेगस्पिनर संदीप लामिछाने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. त्याने आयपीएल 2018 मध्ये तीन सामन्यांत 5 विकेट घेतल्या, तर 8 खेळाडूंनी आयपीएल 2019 मध्ये 6 सामन्यांमध्ये भाग घेऊन बाहेर बसला. आयपीएलमधील लामिछानेची कामगिरी 9 सामन्यांत 13 विकेट अशी राहिली. आयपीएल टीम दिल्ली कॅपिटलमध्ये ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉचा चांगला मित्र आहे.