नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने भारत आणि पाकिस्तान क्रिकेटबाबत धक्कादायक विधान केले आहे. युवराज सिंगने दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध क्रिकेट सामना खेळले तर हा खेळ चांगला होईल, असे मत व्यक्त केले. युवराज आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी असा विश्वास आहे की दोन्ही देश आपापसात खेळले तर क्रिकेटसाठी चांगले होईल. युवराजने स्पोर्ट्स360 दिलेल्या मुलाखतीत, ‘मला पाकिस्तानविरुद्ध 2004, 2006 आणि 2008मध्ये खेळल्याचे आठवत आहे. आजकाल दोन्ही देशांमध्ये फारसे क्रिकेट नाही, परंतु या गोष्टी आमच्या हातात नाहीत.”, असे म्हणाला. तसचे, या दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने झाल्यास क्रिकेटची प्रगती होईल असे मत व्यक्त केले. वाचा- मुंबईकर श्रेयस अय्यर विराटपेक्षा सरस! न्यूझीलंडच्या भूमीत रचले वर्ल्ड रेकॉर्ड युवराज आणि आफ्रिदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या दोघे फ्रँचायझी-आधारित टी -20 लीगमध्ये खेळतात. आफ्रिदीने भारत-पाक यांच्यात खेळण्याबाबत, ‘मला वाटते भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका असेल तर ती अॅशेसपेक्षा मोठी असेल. आम्हाला अशी संधी मिळत नाही. खेळावरील लोकांच्या प्रेमात आम्ही राजकारण आणतो. ‘, असे मत व्यक्त केले. वाचा- स्मृती मांधनाची एकाकी झुंज अयशस्वी! भारताने 11 धावांनी गमावली ट्राय सीरिज आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरूद्ध खेळत आहेत, परंतु 2013नंतर दोन्ही संघांमध्ये एकही मालिका झालेली नाही. 2008मध्ये भारत-पाक यांच्यात अखेरची कसोटी मालिका खेळली गेली होती. वाचा- संघातून बाहेर असलेल्या रोहित शर्माला चहल म्हणाला,‘जळू नकोस’ भारतीय कबड्डी संघ पोहचला पाकिस्तानात विश्व कबड्डी चॅम्पियनसाठी (सर्किल स्टाईल) भारतीय संघ पाकिस्तानमध्ये (Pakistan) दाखल झाला आहे. मुख्य म्हणजे भारतीय संघ पाकमध्ये दाखल झाल्याबद्दल क्रीडा मंत्री किंवा राष्ट्रीय महासंघ यांपैकी कोणालाही माहिती नव्हती किंवा संघाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र भारतीय संघ परस्पर या चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी शनिवारी वाघा बॉर्डरकडून लाहोरमध्ये पोहचला. पहिल्यांदाच कबड्डी चॅम्पियनशीपचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जात आहे.क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नव्हती. पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी नसताना खेळाडू कसे पोहचले, याची चौकशीही करण्यात येईल असेही सुत्रांनी सांगितले. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे अनिवार्य असलेल्या कोणत्याही संघास परवानगी दिली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.