जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'I am sorry'; उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची हात जोडून मागितली माफी?, पाहा VIDEO

'I am sorry'; उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची हात जोडून मागितली माफी?, पाहा VIDEO

'I am sorry'; उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची हात जोडून मागितली माफी?, पाहा VIDEO

मुंबई, 13 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशीचं नाव पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहसोबत जोडलं जात आहे. मात्र नसीम शाहने उर्वशी रौतेलाला ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर उर्वशीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली. अशातच उर्वशी पुन्हा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे चर्चेचा विषय ठरतेय. उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतला छोटू भैया संबोधलं होतं. उर्वशीने एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशीचं नाव पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहसोबत जोडलं जात आहे. मात्र नसीम शाहने उर्वशी रौतेलाला ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर उर्वशीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली. अशातच उर्वशी पुन्हा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे चर्चेचा विषय ठरतेय. उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतला छोटू भैया संबोधलं होतं. उर्वशीने एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा. मी काही मुन्नी नाहीये तुमच्यासाठी बदनाम व्हायला. उर्वशीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. मात्र आता उर्वशीने हात जोडून ऋषभ पंतची माफी मागितली आहे.

जाहिरात

एका मुलाखतीदरम्यान, उर्वशीला विचारण्यात आलं होतं की आरपीला काय संदेश देशील. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने म्हटलं की, सीधी बात नो बकवास त्यामुळे मी कोणतीही बकवास करत नाहीये. पुढे उर्वशीला विचारण्यात आलं की, तुला ऋषभ पंतला काही सांगायचं आहे का?. कारण तू म्हटलं होतंस की माफ करा आणि विसरुन जा. यावर उर्वशी म्हणते मला काहीही बोलायचे नाही. त्यानंतर उर्वशी म्हणते सॉरी मला माफ कर. हेही वाचा -  पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबतच्या व्हिडीओवर Urvashi Rautelaने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली… दरम्यान, उर्वशी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली होती. तेव्हापासून उर्वशीचे नाव नसीम शाहसोबत जोडले जात आहे. अशातच उर्वशीचा हा माफी मागताना व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा ऋषभ आणि उर्वशीच्या नात्याची एकच चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात