नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त घोडदौड कायम ठेवली आहे. जपानला फक्त 41 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने दहा गडी राखून विजय साजरा केला. तत्पूर्वी, भारताच्या भेदक माऱ्यासमोर जपानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फिरकीपटू रवि बिश्नोईने 5 धावांत 4 बळी घेतले. तर कार्तिक त्यागीने 3 , आकाश सिंगने 2 आणि विद्याधर पाटीलने 1 गडी बाद केला. जपानकडून सलामीवीर शु नोगुची आणि 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केंटो डोबेल यांनी प्रत्येकी 7 धावा काढल्या. या त्यांच्या संघाकडून सर्वाधिक धावा ठरल्या. त्यांचे 5 फलंदाज खातंही उघडू शकले नाही. जपानची अवस्था एकवेळ 7 बाद 19 अशी झाली होती. 8 व्या गड्यासाठी डोबेल आणि मॅक्समिलन क्लीमेंट यांनी 13 धावांची भागिदारी केली. त्यांच्या डावातील सर्वात मोठी भागिदारी ठरली. भारताने जपानविरुद्धचा सामना 4.5 षटकांत जिंकला. जपानने दिलेलं 42 धावांच माफक आव्हान सलामीच्या जोडीने फक्त 29 चेंडूत पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने नाबाद 29 तर कुमार कुशर्गाने नाबाद 13 धावा काढल्या. गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड? भारताचा कर्णधार प्रियम गर्गने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांनी पहिल्या चार षटकांत फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर जपानचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. 2 बाद 14 वरून त्यांची अवस्था 7 बाद 19 अशी झाली होती. सलमानची स्टाईल मारायला गेला आणि झाला ट्रोल! चहलच्या फोटोवर रोहितची फिरकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.