मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs PAK : पराभवानंतरही भारताला मिळाले 4 हिरो, एक बारावीत, दुसऱ्याला पूर्ण करायचंय वडिलांचं स्वप्न

IND vs PAK : पराभवानंतरही भारताला मिळाले 4 हिरो, एक बारावीत, दुसऱ्याला पूर्ण करायचंय वडिलांचं स्वप्न

अंडर-19 आशिया कपमध्ये (Under 19 Asia Cup) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) अखेरच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने 2 विकेटने विजय मिळवला. पराभव झाला असला तरी भारताला या सामन्यातून चार हिरो मिळाले आहेत.

अंडर-19 आशिया कपमध्ये (Under 19 Asia Cup) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) अखेरच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने 2 विकेटने विजय मिळवला. पराभव झाला असला तरी भारताला या सामन्यातून चार हिरो मिळाले आहेत.

अंडर-19 आशिया कपमध्ये (Under 19 Asia Cup) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) अखेरच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने 2 विकेटने विजय मिळवला. पराभव झाला असला तरी भारताला या सामन्यातून चार हिरो मिळाले आहेत.

मुंबई, 25 डिसेंबर : अंडर-19 आशिया कपमध्ये (Under 19 Asia Cup) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) अखेरच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने 2 विकेटने विजय मिळवला. भारतीय टीमचा या सामन्यात पराभव झाला असला तरी आराध्य यादव (Aaradhya Yadav), राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar), राज अंगद बावा (Raj Bawa) आणि हरनूर सिंग (Harnoor singh) हे चार स्टार खेळाडू भारताला मिळाले आहेत. आशिया कपनंतर हे खेळाडू पुढच्या महिन्यात होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठीही तयार आहेत.

आराध्य यादवचे वडील अजय यादव दिल्ली पोलीसमध्ये इन्सपेक्टर आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. आराध्य मूळचा उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचा आहे. आराध्यने आशिया कपआधी रोहित शर्माने एनसीएमध्ये दिलेल्या टिप्सबाबत सांगितलं. 'तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळत आहात, पण जेव्हा देशासाठी खेळता तेव्हा एकजूट होऊन खेळावं लागतं,' असं रोहितने आराध्यला सांगितलं. आराध्य 12वी मध्ये आहे. करियरसोबत त्याला अभ्यासावरही लक्ष केंद्रीत करायचं आहे.

4 मॅचमध्ये 3 शतकं

चंडीगडचा हरनूर सिंग बीए पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तो सगळ्यात यशस्वी बॅटर होता. हरनूर 4 मॅचच्या 4 इनिंगमध्ये बॅटिंगला उतरला, यातल्या 2 इनिंगमध्ये तो नाबाद राहिला. तसंच त्याने सर्वाधिक 3 शतकं केली आणि 412 रन केले. 137 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. याशिवाय ट्राय सीरिजमध्येही त्याने 3 मॅच खेळून 191 रन केले, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. हरनूरने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईविरुद्ध 120 रनची शानदार खेळी केली होती.

राजवर्धन हंगर्गेकरचं इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. महाराष्ट्राच्या तुळजापूरचा रहिवासी असणाऱ्या राजवर्धनच्या वडिलांचं मागच्यावर्षी कोरोनामुळे निधन झालं. माझं इथपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं, देशासाठी खेळण्याचं वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, असं राजवर्धन म्हणाला. फास्ट बॉलर असलेल्या राजवर्धनने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विनू मंकड ट्रॉफीमध्ये 8 मॅच खेळून 19 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने 216 रनही केले होते. अंडर-14 स्पर्धेत तो उस्मानाबादकडून ऑफ स्पिनर म्हणून खेळला होता, पण टीममध्ये फास्ट बॉलरची कमी असल्यामुळे त्याने फास्ट बॉलिंग करायला सुरुवात केली. राजवर्धन सध्या 140 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करत आहे. पहिल्या सामन्यात त्याने 23 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, याशिवाय 3 विकेटही घेतल्या.

IND vs PAK : 4,4,4,4,4,6, तुळजापूरच्या राजवर्धनने पाकिस्तानला धुतलं!

वडिलांनी कोच म्हणून दिलं ट्रेनिंग

चंडीगडचे सीनियर क्रिकेट को सुखविदर बावा यांनी मुलगा राज अंगद बावा याला ट्रेनिंग दिलं. कोच बावा यांनी युवराज सिंगलाही सुरुवातीला कोचिंग केलं होतं. त्यांना आता मुलगा अंगदकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. अंगदने चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया-बीचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध त्याने 4 विकेट घेतल्या, याशिवाय बॅटनेही योगदान दिलं.

First published:
top videos