त्रिनिदाद, 1 मार्च : आयपीएल 2022 च्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्यामुळे लवकरच प्रत्येक देशाचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतील. सध्या काही खेळाडू त्यांच्या देशासाठी तर काही जण वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत आहेत. मुंबई इंडियन्सनचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हा सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-10 ब्लास्टमध्ये (Trinidad T10 Blast) खेळत आहे. यातल्या एका सामन्यात पोलार्डने ऑफ स्पिन बॉलिंग केली आणि एक विकेटही घेतली. आयपीएल 2022 साठी (IPL 2022) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पोलार्डला रिटेन केलं. आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली, या पाचही वेळा पोलार्ड मुंबईच्या टीमचा भाग होता.
कायरन पोलार्डने स्कार्लेट स्कॉचर्सकडून खेळताना सोआ किंगविरुद्ध एक ओव्हर बॉलिंग केली आणि एक विकेटही घेतली. या मॅचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅचमध्ये सोआ किंगने पहिले खेळताना 3 विकेट गमावून 150 रन केले. सुनिल नारायणने 13 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. याशिवाय जेसन मोहम्मद 21 बॉलमध्ये 55 रनवर नाबाद राहिला.
. @KieronPollard55 proves he can be lethal, even while bowling off-spin! 😱
📺 Watch the best moments from this Dream11 Trinidad T10 Blast match on #FanCode 👉 https://t.co/c8dKvIy6GE pic.twitter.com/rLxI0OYTpu — FanCode (@FanCode) February 27, 2022
सोआ किंगच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कार्लेटने (Scoa King vs Scarlet Ibis Scorchers) 8 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 80 रन केल्या, पण पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पोलार्ड 6 बॉलमध्ये 8 रन करून आऊट झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार सोआ किंगचा 42 रनने विजय झाला.
11 हजार रन, 300 पेक्षा जास्त विकेट
34 वर्षांच्या कायरन पोलार्डच्या नेतृत्वात काहीच दिवसांपूर्वा वेस्ट इंडिजची टीम वनडे आणि टी-20 सीरिज खेळण्यासाठी भारतात (India vs West Indies) आली होती, पण दोन्ही सीरिजमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी लाजिरवाणी झाली. वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश केलं.
पोलार्डने त्याच्या टी-20 करियरमध्ये 515 इनिंगमध्ये 32 च्या सरासरीने 11,427 रन केले, यामध्ये एक शतक आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 152 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, तसंच 764 सिक्सही मारल्या.
पोलार्डने बॉलर म्हणून 369 इनिंगमध्ये 25 च्या सरासरीने 304 विकेट घेतल्या. 15 रन देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 8 पेक्षा जास्त आहे. 7 वेळा त्याने 4 विकेट घ्यायचा रेकॉर्ड केला आहे. तसंच तो वेस्ट इंडिजकडून 100 टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणारा पहिला खेळाडूही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians