जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Paralympics : देवेंद्र-सुंदरची कमाल ! भारताला एकाच प्रकारात 2 मेडल

Tokyo Paralympics : देवेंद्र-सुंदरची कमाल ! भारताला एकाच प्रकारात 2 मेडल

Tokyo Paralympics : देवेंद्र-सुंदरची कमाल ! भारताला एकाच प्रकारात 2 मेडल

टोकयोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय खेळाडू मेडल्सची लयलूट करत आहेत. भालाफेक स्पर्धेत देवेंद्र झाझरिया (Devendra Jhajharia) आणि सुंदर सिंह गूर्जर (Sundar Singh Gurjar) यांनी मेडल पटकावले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

टोकयो, 30 ऑगस्ट : टोकयोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय खेळाडू मेडल्सची लयलूट करत आहेत. भालाफेक स्पर्धेत देवेंद्र झाझरिया (Devendra Jhajharia) आणि सुंदर सिंह गूर्जर (Sundar Singh Gurjar) यांनी मेडल पटकावले आहे. देवेंद्रनं सिल्व्हर तर सुंदरनं ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. भारतानं सोमवारी या स्पर्धेत चार मेडल पटकावले असून एकूण मेडलची संख्या आता सात झाली आहे.

जाहिरात
जाहिरात

40 वर्षाच्या देवेंद्रनं यापूर्वी दोन वेळा पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. त्यानं 2004 साली सर्व प्रथम गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानं 2004 साली अथेन्समध्ये सर्वप्रथम गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर 2016 साली रिओमध्येही त्यानं गोल्डची कमाई केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात