टोकयो, 30 ऑगस्ट: टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरत आहे. अवनी लखेरानं शूटिंगमध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडलची कमाई केली. त्यापाठोपाठ योगेश कथूनियानं (India's Yogesh Kathuniya wins silver medal in discus throw) थाळी फेक स्पर्धेत सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. भारताला या स्पर्धेत मिळालेलं हे पाचवं मेडल आहे.
Tokyo Paralympics: India's Yogesh Kathuniya clinches silver in F56 discus throw event
Read @ANI Story | https://t.co/RNFqkLUMMz#TokyoParalympics #YogeshKathuniya pic.twitter.com/fqc0cVdTt1 — ANI Digital (@ani_digital) August 30, 2021
योगेशला आठव्या वर्षी लकवा झाला होता. त्यानं या व्याथीवर मात करत ही कमाई केली. थाळीफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यानं सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत सिल्व्हर मेडल पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशाबद्दल योगेशचं अभिनंदन केलं आहे.
Outstanding performance by Yogesh Kathuniya. Delighted that he brings home the Silver medal. His exemplary success will motivate budding athletes. Congrats to him. Wishing him the very best for his future endeavours. #Paralympics
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
यापूर्वी भारताच्या अवनी लखेरानं 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. 19 वर्षांच्या या महिला शूटरनं 294.6 पॉईंट्सची कमाई करत गोल्ड मेडल पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेनं पटाकवलेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021, Sports