• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : आपली नारी जगात भारी! 125 वर्षात पहिल्यांदाच 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला

Tokyo Olympics : आपली नारी जगात भारी! 125 वर्षात पहिल्यांदाच 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला

महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) भारताला ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) तिसरं मेडल मिळवून दिलं. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं.

 • Share this:
  टोकयो, 1 ऑगस्ट : महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) भारताला ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) तिसरं मेडल मिळवून दिलं. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दोन मेडल जिंकले आहेत, तर तिसरं मेडल निश्चित झालं आहे. महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सिल्व्हर मेडल जिंकलं, तर महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) सेमी फायनलमध्ये पोहोचून मेडल निश्चित केलं आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन मेडल मिळाले होते, म्हणजेच भारताने आता मेडलच्या बाबतीत रियोतल्या कामगिरीला मागे टाकलं आहे. 125 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारतीय महिला खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी कधीच भारताच्या तीन महिलांना एका ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं नव्हतं. 2000 साली पहिलं मेडल भारतीय महिला खेळाडूंना पहिलं मेडल पटकावण्यासाठी 104 वर्ष वाट पाहावी लागली होती. 1896 साली ऑलिम्पिक सुरू झालं होतं. 2000 साली महिला वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीला (karnam malleswari) ब्रॉन्झ मेडल जिंकून खातं उघडलं होतं. यानंतर 2004 आणि 2008 साली ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांना एकही मेडल मिळालं नव्हतं. लंडनमध्ये सायना-मेरीकोमचा करिश्मा 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दोन भारतीय महिला खेळाडूंना मेडल मिळालं. सायना नेहवालने (Saina Nehwal) बॅडमिंटनमध्ये आणि मेरीकोमने (Mary Kom) बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं. 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने सिल्व्हर आणि महिला पैलवान साक्षी मलिकने (Sakshi Malik) ब्रॉन्झ पटकावलं. रियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही पुरुष खेळाडूंना पदक पटकावता आलं नव्हतं. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली होती. भारतीय महिला खेळाडूला अजूनपर्यंत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकता आलेलं नाही, यावेळी मात्र भारताची ही प्रतिक्षा संपू शकते. लवलीना शिवाय कुस्तीमध्ये विनेश फोगट (Vinesh Phogat गोल्ड मेडलची कमाई करू शकते.
  Published by:Shreyas
  First published: